मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Winter Traveling: हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? ट्राय करा हे बजेट फ्रेंडली ठिकाणांचे पर्याय

Winter Traveling: हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? ट्राय करा हे बजेट फ्रेंडली ठिकाणांचे पर्याय

Nov 07, 2022, 01:42 PM IST

    • आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही हिवाळ्यात सहज कमी बजेटमध्ये फिरायला जाऊ शकता.
विंटर ट्रॅव्हल (Freepik)

आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही हिवाळ्यात सहज कमी बजेटमध्ये फिरायला जाऊ शकता.

    • आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही हिवाळ्यात सहज कमी बजेटमध्ये फिरायला जाऊ शकता.

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही उन्हाळ्यात फिरायला जाऊ शकता. परंतु उन्हाळ्यात उन्हामुळे आणि गर्मीमुळे फिरायची इच्छा होत नाही. यामुळे अनेकदा आपण आजारीही पडतो. त्यामुळे फिरण्यासाठी हिवाळा हा ऋतू बेस्ट आहे. अशाच काही हिवाळ्यात भेट देण्यासाठी योग्य जागांबद्दल सांगत आहोत. विशेष म्हणजे या ठिकाणी जाणे तुमच्या खिशाला अनुकूल असेल. अर्थात या जागा बजेट फ्रेंडली आहेत. जाणून घेऊयात अशा ठिकाणांबद्दल...

ट्रेंडिंग न्यूज

Tanning Remove: रोज बेसन वापरल्यामुळे उद्भवू शकतात त्वचेच्या समस्या, हा आहे टॅनिंग दूर करण्याचा उत्तम उपाय

Jewelry Care Tips: उन्हाळ्यात दागिन्यांची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सोप्या टिप्स!

Maharashtra Day 2024 Recipe: महाराष्ट्र दिनानिमित्ताने जेवणासाठी बनवा मराठमोळी आमरस पुरी, जाणून घ्या रेसिपी!

Joke of the day : मला बायकोविरुद्ध लढण्यासाठी हिम्मत पाहिजे असं जेव्हा ग्राहक दुकानदाराला म्हणतो…

उदयपूर

हे हिवाळ्यात भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. या शहराला तलावांचे शहर असेही म्हणतात. येथे सुंदर राजवाडे आणि तलाव आहेत तसेच शहरात भेट देण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे आहेत. ऑक्टोबर ते मार्च दरम्यानचा काळ येथे भेट देण्यासाठी योग्य आहे.

कसौल

या ठिकाणचं हे नाव तुम्ही तुमच्या चित्रपटांमध्ये आणि तुमच्या मित्रांकडूनही ऐकले असेल. या छोट्याशा गावात फक्त फिरण्यासाठीच नाही तर स्थानिक जीवन जगण्यासाठीही भरपूर सुविधा आहेत. तुम्हाला इथे पर्यटक असल्यासारखे वाटणार नाही. या ठिकाणी तुम्ही ३ ते ४ हजार फिरू शकता.

औली

हे उत्तराखंडमधील सर्वात स्वस्त शहरांपैकी एक आहे. या ठिकाणचे सौंदर्य तुम्हाला भुरळ पाडेल आणि घरी परत आल्यासारखे वाटणार नाही. येथे तुम्ही नंदा देवी पार्क, औली कृत्रिम तलाव आणि गोरसन बुग्याल इत्यादींच्या फेरफटका मारू शकता.

जयपूर

गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरमध्ये तुम्ही उन्हाळ्यात गेलात तर सूर्य तुम्हालाही कधी कोरडे करेल हे कळणार नाही. त्यामुळे हिवाळ्यातील महिने येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम असतात. कमी बजेटमध्ये तुम्ही येथे सहलीचे नियोजन करू शकता.

 

विभाग