मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Maharashtra Day 2024 Recipe: महाराष्ट्र दिनानिमित्ताने जेवणासाठी बनवा मराठमोळी आमरस पुरी, जाणून घ्या रेसिपी!

Maharashtra Day 2024 Recipe: महाराष्ट्र दिनानिमित्ताने जेवणासाठी बनवा मराठमोळी आमरस पुरी, जाणून घ्या रेसिपी!

May 01, 2024, 10:19 AM IST

    • Aam Ras Poori Recipe: या कडक उन्हाळ्यात, महाराष्ट्रीयन डिश आमरसाचा आस्वाद घ्या आणि महाराष्ट्र्र दिन आणखी खास बनवा. जाणून घ्या सोपी रेसिपी.
how to make Aamras Puri know recipe (Radisson Blu Karjat)

Aam Ras Poori Recipe: या कडक उन्हाळ्यात, महाराष्ट्रीयन डिश आमरसाचा आस्वाद घ्या आणि महाराष्ट्र्र दिन आणखी खास बनवा. जाणून घ्या सोपी रेसिपी.

    • Aam Ras Poori Recipe: या कडक उन्हाळ्यात, महाराष्ट्रीयन डिश आमरसाचा आस्वाद घ्या आणि महाराष्ट्र्र दिन आणखी खास बनवा. जाणून घ्या सोपी रेसिपी.

Summer Recipe: दरवर्षी महाराष्ट्र दिन १ मे रोजी मोठ्या थाटामाटात साजरा करतात. १ मे १९६० रोजी मुंबई पुनर्रचना कायदा लागू झाल्यानंतर राज्याच्या अस्तित्वाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. स्वतंत्र राज्याची मागणी सर्वप्रथम संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाने केली होती. १९६० मध्ये महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झाल्याचा १ मे हा दिवस आहे. बॉम्बे पुनर्रचना कायदा लागू होण्यापूर्वी, मुंबई अस्तित्वात होती, ज्यामध्ये कच्छी, गुजराती, मराठी आणि कोकणी या चार प्रमुख भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश होता. हा कायदा लागू झाल्यानंतर, पूर्वीच्या मुंबई प्रांताची लोकांच्या भाषेच्या आधारे दोन राज्यांमध्ये विभागणी झाली, ते म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र. १ मे हा महाराष्ट्रातील लोकांसाठी हा दिवस महत्त्वाचा असल्याने, हा दिवस आंबा खाऊन साजरा होयलाच हवा. या कडक उन्हाळ्यात, महाराष्ट्रीयन आमरस आणि पुरी या मराठमोळ्या डिशचा आस्वाद घ्या आणि तुमचा दिवस आणखी खास बनवा. उन्हाळ्याची ही आनंददायी ट्रीट घरच्या घरी तयार करण्यासाठी ही एक सोपी रेसिपी जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Healthy Heart: वाढत्या तापमानामुळे वाढू शकते हृदयाशी संबंधित समस्या, उन्हाळ्यात या टिप्सने हेल्दी ठेवा हार्ट

Virgin Mojito: घरी सोप्या पद्धतीने बनवा मार्केटसारखे व्हर्जिन मोईतो, नोट करा रेसिपी

Summer Hair Care: उन्हाळ्यात टाळूवर खूप घाम येतो का? ते कमी करण्यासाठी करा हे उपाय

Joke of the day : एका लग्नात संतू खूप वेळ जेवत बसलेला असतो, त्याला पाहून अंतू म्हणतो…

आमरससाठी लागणारे साहित्य

२ आंबे

५०० मिली फुल फॅट दूध

६ चमचे साखर

६-७ बर्फाचे तुकडे

१/२ टीस्पून मीठ

१ टीस्पून तेल

आवश्यकतेनुसार पाणी

तळण्यासाठी तेल

International Labour Day 2024: आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्ताने या मराठमोळ्या शुभेच्छा ठेवा स्टेटसला!

जाणून घ्या कृती

> पिकलेले आंबे घ्या, ते धुवून चांगले कोरडे करा.

> आता साल काढून घ्या आणि आंबे कापून त्याच्या गुठळ्या वेगळे करा. आता आंब्याच्या मोठ्या तुकड्यांचे छोटे तुकडे करा.

> आता उरलेले सर्व साहित्य तयार ठेवा. मिक्सरमध्ये आंब्याचे तुकडे टाका. साखर, दूध आणि बर्फाचे तुकडे घालून बारीक करा.

> तुमचा आंब्याचा रस तयार आहे.

Marathi Rajbhasha Din 2024: मराठी राजभाषा भाषा दिनानिमित्त प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा!

> पुरी बनवण्यासाठी पीठ मळायचं भांडं घ्या. त्यात पीठ घाला. आता एक चमचा तेल आणि मीठ घालून मिक्स करा. थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ बनवा. १० मिनिटे विश्रांती द्या.

> विश्रांती दिल्यावर, लहान गोळे तयार करा. छोट्या पुऱ्यांच्या आकारात लाटून घ्या.

> कढईत तेल गरम करून कच्च्या पुऱ्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा.

> तुमच्या गरमागरम पुऱ्या तयार आहेत. हे आमरसासोबत सर्व्ह करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

पुढील बातम्या