International Labour Day 2024 Wishes in Marathi: आंतरराष्ट्रीय कामगार दिन दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील कामगार आणि कामगार वर्गाच्या योगदान आणि बलिदानाचा सन्मान करण्याची संधी आहे. हा दिवस आपल्याला कामगारांच्या हक्कांसाठी आणि चांगल्या कामाच्या परिस्थितीसाठी केलेल्या संघर्षाच्या इतिहासाची आठवण करून देतो. १८८९ मध्ये दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसने १ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून हा दिवस जगभरातील कामगार साजरा करतात. कामगार दिन आपल्याला कामगारांच्या योगदानाची आठवण करून देतो, जे समाजाच्या उभारणीत आणि विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या खास दिनी शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला मराठीत मेसेज हवे असतील तर आम्ही या शुभेच्छा संदेश (messages, wishes, Facebook, WhatsApp Status, quotes) घेऊन आलो आहोत.
> दिवस हक्काचा
दिवस कामगारांचा
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
> देशाच्या जडणघडणीत
मोलाचे योगदान देणाऱ्या श्रमिक बांधवांना
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण
कामगार दिनाच्या शुभेच्छा!
> मी मानतो तो कामात आहे
नाही कुठे तो घामात आहे
शोधात जो तो उगाच त्याच्या
तो राबणार या घामात आहे
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
> तो जिवंत ठेवतो कामाचे आगार,
उभारतोस स्वप्नांचे मीनार
कामगारा तुझ्या कष्टाला,
लाख लाख सलाम
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
> एक मशीन पन्नास सामान्य व्यक्तींची कामे करू शकते
पण कोणताही संगणक एका अपवादात्मक व्यक्तीचे श्रम करू शकत नाही..
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
> कोणतेही काम क्षुल्लक नसते,
मानवतेची उन्नती करणाऱ्या सर्व श्रमांना प्रतिष्ठा आणि महत्त्व आहे
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
>काम करा हो काम करा
कामावरती प्रेम करा....
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
>देशाच्या जडणघडणीत मोलाचे
योगदान देणाऱ्या माझ्या सर्व
श्रमिक बांधवांना…
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
संबंधित बातम्या