Maharashtra Day 2024: भारताच्या महाराष्ट्र राज्यात दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. १९६० मध्ये महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झाल्याचा हा दिवस आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचे वैभव लक्षात ठेवण्याची आणि राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्याची संधी हा दिवस देतो. महाराष्ट्र दिन दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. १९६० मध्ये या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन नवीन राज्यांची निर्मिती झाली. मुंबई शहर हा दोन राज्यांमधील वादाचा विषय बनला. मुंबईतील बहुतेक लोक मराठी भाषा बोलतात म्हणून हे शहर महाराष्ट्र राज्यात आले. या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला मराठीत मेसेज हवे असतील तर आम्ही या शुभेच्छा संदेश (messages, wishes, Facebook, WhatsApp Status, quotes) घेऊन आलो आहोत.
> आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्रीय असल्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा, आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा, महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
> महान संतांची जन्मभूमी, विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी हीच आहे आमची संस्कृती. महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
> भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा !
> जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी…
गुणगुणलो जे गीत गीत मराठी….
मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
> लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…
मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
> सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया,
एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया,
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश!
> पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन
आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश!