मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Travel: भारतातील 'या' सुंदर ठिकाणांना ५ हजारांच्या बजेटमध्ये देऊ शकता भेट!

Travel: भारतातील 'या' सुंदर ठिकाणांना ५ हजारांच्या बजेटमध्ये देऊ शकता भेट!

Sep 18, 2022, 11:31 AM IST

    • Budget Trips: भारतातील अशी अनेक ठिकाणे आहोत, जिथे तुम्हाला फिरण्यासाठी खूप पैशांची गरज नाही.
भारतीय टुरिझम (unsplash)

Budget Trips: भारतातील अशी अनेक ठिकाणे आहोत, जिथे तुम्हाला फिरण्यासाठी खूप पैशांची गरज नाही.

    • Budget Trips: भारतातील अशी अनेक ठिकाणे आहोत, जिथे तुम्हाला फिरण्यासाठी खूप पैशांची गरज नाही.

जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल पण बजेटमुळे तुम्हाला प्रवासाचा आनंद घेता येत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही फक्त ५ हजारात फिरू शकता. भारतातील अशी अनेक ठिकाणे आहोत, जिथे तुम्हाला फिरण्यासाठी खूप पैशांची गरज नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Marathi Rajbhasha Din 2024: मराठी राजभाषा भाषा दिनानिमित्त प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा!

Karela Sabji Recipe: कडू कारल्याची भाजी सुद्धा सगळे खातील आवडीने, फक्त बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी

Skin Care Routine: उन्हाळ्यात सावळ्या त्वचेची अशी घ्या काळजी, या रुटीनने ग्लो करेल चेहरा

Breast Cancer: महिलांमध्ये वाढतोय स्तनाचा कर्करोग, जाणून घ्या योग्य माहिती आणि उपचारांबद्दल!

वृंदावन

वृंदावन हे केवळ मंदिरे आणि धार्मिक लोकांना भेट देण्यासाठी नाही, येथे कोणीही जाऊन शांतता मिळवू शकतो. वृंदावनाचे नाव इतिहासात नोंदले गेले असून येथे अनेक सुंदर ठिकाणे आहेत. येथे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला येथे राहण्यासाठी हॉटेल्स अगदी कमी किमतीत मिळतील.

लॅन्सडाउन

लॅन्सडाउन उत्तराखंडच्या मैदानी प्रदेशात आहे. लॅन्सडाउन इतके सुंदर आहे की तुम्ही त्याच्या सौंदर्यात हरवून जाल. हे लष्कराचे ठिकाण आहे, त्यामुळे येथे सहसा फारशी गर्दी नसते. हे ठिकाण दिल्लीपासून सुमारे २५० किमी अंतरावर आहे. येथे तुम्हाला राहण्यासाठी १००० ते १५०० रुपयांमध्ये हॉटेल मिळेल.

हम्पी

हम्पीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे पण हे ठिकाण इतके वेगळे आणि अद्भुत आहे की तुम्हाला येथे पुन्हा पुन्हा भेट द्यायची इच्छा होईल. येथे तुम्हाला देशी लोकांसोबत विदेशी पर्यटकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळेल. यामुळेच तुम्हाला येथे राहण्यासाठी बजेट पर्याय मिळतील. तसेच, खाण्यापिण्याचे अनेक पर्याय आहेत.

वाराणसी

येथील संध्याकाळची गंगा आरती खूप सुंदर असते. हे ठिकाण धार्मिक स्वरांनीही प्रसिद्ध असल्याने तुम्हाला येथे राहण्यासाठीही अनेक स्वस्त पर्याय मिळतील. तुम्ही येथे ३०० रुपये प्रतिदिन मुक्काम करू शकता.

विभाग