मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Marathi Rajbhasha Din 2024: मराठी राजभाषा भाषा दिनानिमित्त प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा!

Marathi Rajbhasha Din 2024: मराठी राजभाषा भाषा दिनानिमित्त प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा!

Apr 30, 2024, 03:21 PM IST

    • Marathi Rajbhasha Din Wishes: १० एप्रिल १९९७ पासून १ मे हा 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
When is Marathi Rajbhasha Din 2024 (sharechat)

Marathi Rajbhasha Din Wishes: १० एप्रिल १९९७ पासून १ मे हा 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.

    • Marathi Rajbhasha Din Wishes: १० एप्रिल १९९७ पासून १ मे हा 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.

Marathi Rajbhasha Din 2024 Messages: १ मे ही तारीख फार महत्त्वाची आहे. याच तारखेला महाराष्ट्र दिन, कामगार दिन असतो. एवढंच नाही तर मराठी भाषा दिनही १ मे लाच साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं १० एप्रिल १९९७ रोजी काढलेल्या परिपत्रकात १ मे हा 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खरं तर १ मेला हे ठरलं होतं पण परंतु, कालांतरानं हे परिपत्रक विस्मृतीत गेला. त्यामुळं १९९७ ला शासनाला पुन्हा परिपत्रक काढावं लागलं. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्य कारभाराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता देण्यात आली. तेव्हापासून १ मे दिवस हा 'मराठी राजभाषा दिन' किंवा 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. या खास दिनी शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला मराठीत मेसेज हवे असतील तर आम्ही या शुभेच्छा संदेश (messages, wishes, Facebook, WhatsApp Status, quotes) घेऊन आलो आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

बघा शुभेच्छा संदेश

>लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

सर्व मराठी बांधवांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

>परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत

आमची माय मराठी

अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते

आमची माय मराठी

संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे

आमची माय मराठी

नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही

आमची माय मराठी

मराठी राजभाषा दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

भाषांचा भावार्थ मराठी,

बात मराठी, साथ मराठी

जगण्याला या अर्थ मराठी

मराठी राजभाषा  दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

खुलवू मराठी भाषा

जगवू मराठी भाषा

येणा-या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेल

अशी सदैव राहो माझी मराठी भाषा

मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

परि अमृतातेहि पैजासी जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।

एवढ्या जगात माय मानतो मराठी।।

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

(मेसेज क्रेडिट: सोशल मीडिया)

 

विभाग

पुढील बातम्या