Beautiful Destinations of Maharashtra: २०२४ वर्षात अनेक लॉंग विकेंड येणार आहेत. यातला पहिला लॉंग विकेंड म्हणजे २६ ते २८ जानेवारी. तुम्हाला जमल्यास तुम्ही २५ जानेवारीलाही सुट्टी टाकून ४ दिवसांची सुट्टी एन्जॉय करू शकता. या सुट्टीमध्ये तुम्ही कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास जागा घेऊन आलो आहोत. हे ठिकाण आपल्या महाराष्ट्रातच आहे. हिवाळ्यात तुम्ही भेट देण्यासाठी बीच डेस्टिनेशन्स ही सर्वोत्तम ठिकाणे आहेत. गोवा असं ठिकाण जर तुमच्या डोक्यात आलं तर ते हे ठिकाण नाही. तिकडे सुट्टीच्या काळात फार गर्दी असते. पण जर तुम्हाला शांत समुद्रकिनाऱ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तारकर्लीला भेट देऊ शकता. तिकडच्या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. चला याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
हिवाळ्यातील लॉंग वीकेंडला चादरीत बसून टीव्ही पाहण्यात वेळ घालवायचे नसेल तर, महाराष्ट्रातील तारकर्लीचा प्लॅन करा. हा बीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक छोटेसे सुंदर गाव आहे. या गावात अनेक स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत. पण या सगळ्यात सर्वात प्रसिद्ध आहे ते म्हणजे तारकर्ली बीच. हा बीच खूपच शांत आणि सुंदर आहे.
तारकर्लीतील दुसरा सुंदर समुद्रकिनारा म्हणजे आचरा बीच. आचरा बीच तारकर्ली बीचपासून अवघ्या ६ किमी अंतरावर हा बीच आहे. या बीचबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, त्यामुळे पर्यटकांची गर्दी दिसत नाही. इथे फारच सुंदर असं सुमारे २६० वर्षे जुने रामेश्वर मंदिराही भेट देऊ शकता.
समुद्रकिनारे बघण्याचा कंटाळा आला असेल तर धामापूर तलावाला भेट द्या. जे सुमारे १० एकरात पसरलेले सुंदर तलाव आहे. या तलावात वॉटर अॅक्टिव्हिटीचे पर्यायही उपलब्ध असतील. पिकनिकसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)