मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Karela Sabji Recipe: कडू कारल्याची भाजी सुद्धा सगळे खातील आवडीने, फक्त बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी

Karela Sabji Recipe: कडू कारल्याची भाजी सुद्धा सगळे खातील आवडीने, फक्त बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी

Apr 30, 2024, 01:34 PM IST

    • Karela Bhaji Recipe: मुलान मुले आणि मोठ्यांना कारले खायला आवडत नाही. परंतु जर तुम्हाला त्यांना कारल्याची भाजी खायला द्यायची असेल तर या रेसिपीने तयार करा. ही भाजी सर्वांनाच खायला आवडेल.
Karela Sabji Recipe: कडू कारल्याची भाजी सुद्धा सगळे खातील आवडीने, फक्त बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी (freepik)

Karela Bhaji Recipe: मुलान मुले आणि मोठ्यांना कारले खायला आवडत नाही. परंतु जर तुम्हाला त्यांना कारल्याची भाजी खायला द्यायची असेल तर या रेसिपीने तयार करा. ही भाजी सर्वांनाच खायला आवडेल.

    • Karela Bhaji Recipe: मुलान मुले आणि मोठ्यांना कारले खायला आवडत नाही. परंतु जर तुम्हाला त्यांना कारल्याची भाजी खायला द्यायची असेल तर या रेसिपीने तयार करा. ही भाजी सर्वांनाच खायला आवडेल.

Bitter Gourd Sabji Recipe: लहान मुलेच काय पण कारल्याच्या भाजीचे नाव ऐकून मोठे देखील नाक मुरडतात. पण जर तुम्हाला बाजारात ताजी कारली मिळाली तर नक्कीच घरी आणा आणि अशा प्रकारे तयार करा. चटपटीत कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर प्रत्येक जण, मुले आणि मोठे दोघेही खूश होतील. ही रेसिपी बनवायला सोपी आणि खायला टेस्टी आहे. विशेष म्हणजे कारल्याचा कडूपणा अजिबात जाणवत नाही. चला तर मग जाणून घेऊया कारल्याची करी कशी बनवायची.

ट्रेंडिंग न्यूज

National Anti-Terrorism Day: राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन २१ मे रोजी का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

International Tea Day 2024: चहाचे हे ५ प्रकार आहेत आपल्या आरोग्यासाठी उत्तम, तुम्ही ट्राय केलेत का?

Yoga Mantra: ही योगासनं नियमित केल्याने दूर होईल शरीरातील रक्ताची कमतरता, चुकवू नका

Mango Jam: घरच्या घरी झटपट बनवा आंबट गोड मँगो जॅम, मुलांसह मोठ्यांना आवडेल ही रेसिपी

कारल्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य

- कारले

- मोहरीचे तेल

- कांदा उभा चिरलेला

- एक चमचा मीठ

- अर्धा चमचा लाल तिखट

- एक चतुर्थांग चमचा हळद

- एक चमचा धने पावडर

- अर्धा चमचा जिरे पूड

- गरम मसाला

- एक चमचा आमचूर पावडर

- कोथिंबीर

- मीठ

- हळद

- पाणी

कारल्याची भाजी बनवण्याची कृती

सर्वात आधी कारल्याला नीट धुवून हलकेच खरवडून घ्या. आता ते गोलाकार आकारात कापून घ्या. एका बाउलमध्ये कारल्याचे काप घ्या आणि त्यात हळद मीठ घालून मिक्स करा. अर्धा तास पाण्यात ठेवा आणि नंतर ते पाणी गाळून घ्या. आता पॅनमध्ये मोहरीचे तेल घाला. मोहरीच्या तेलाचे प्रमाण थोडे जास्त ठेवावे. जेणेकरून कारले शिजून फ्राय होतील. आता सर्व कारले शिजवून घ्या आणि तेलातून बाहेर काढा. आता उरलेल्या तेलात चिरलेला कांदा टाकून भाजून घ्या. कांदा भाजून लाल झाल्यावर गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी करा. आता यात आधीच तळून घेतलेले कारले मिक्स करा. तसेच मीठ आणि हळद घाला. लाल तिखट, धने पूड, जिरे पूड आणि गरम मसाला एकत्र करून मंद आचेवर झाकून ठेवा आणि पाच मिनिटे शिजू द्या. 

सर्व मसाल्यांची चव कारल्यात शोषली गेल्यावर गॅस बंद करून वरून आमचूर पावडर घालून मिक्स करा. तुमची टेस्टी कारल्याची भाजी तयार आहे.

विभाग

पुढील बातम्या