Tawa Masala Egg Recipe: नाश्ता असो की दुपारचे जेवण अनेकदा नवीन आणि चविष्ट पदार्थ खाण्याची कुटुंबात मागणी असते. जर तुम्ही अंड्याचे शौकीन असाल आणि नवीन डिश आवडत असाल तर तवा मसाला एग बनवा. ज्याची रेसिपी बनवायला सोपी आणि चवीला उत्कृष्ट आहे. ही रेसिपी तुमचा विकेंड खास बनवेल. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही डीश नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊया तवा मसाला एग कसा बनवायचा.
- ४-५ अंडी
- २ बारीक चिरलेले कांदे
- २ इंच आल्याचा तुकडा
- हिरव्या मिरच्या दोन ते तीन
- ३-४ पाकळ्या लसूण
- कोथिंबीर
- लाल तिखट
- चिमूटभर हळद
- एक चमचा जिरे
- एक चमचा काश्मिरी लाल मिरची
- धने पावडर
- गरम मसाला
- मीठ चवीनुसार
सर्वप्रथम अंडी उकळून त्याच साल काढून घ्या. आता पॅनमध्ये तेल टाका आणि या अंड्यांचे दोन भाग करा आणि भाजण्यासाठी पॅनमध्ये टाका. वरून चिमूटभर मीठ, हळद आणि लाल तिखट स्प्रेड करा. अंडी दोन्ही बाजूंनी सोनेरी झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घेऊन बारीक पेस्ट बनवा. आता पॅनमध्ये थोडे तेल घाला आणि ते गरम झाल्यावर जिरे टाकून तडतडून घ्या. जिरे तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा चांगला भाजून सोनेरी झाल्यावर त्यात कोथिंबिरीची पेस्ट घाला. कांदा आणि पेस्ट चांगली भाजून झाल्यावर त्यात गरम मसाला, धने पूड आणि काश्मिरी लाल तिखट घालून मिक्स करून मंद आचेवर भाजा.
जर मसाले पॅनला चिकटत असतील तर थोडे पाणी घालून मिक्स करा. जेणेकरून मसाले भाजले जातील आणि जळणार नाहीत. तयार मसाल्यामध्ये फक्त चांगले शिजवलेले अंडी घाला आणि मिक्स करा. तुमची टेस्टी तवा मसाला एग सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.