Sprout Bhel: वेट लॉसच नाही तर चवीचीही काळजी घेते चटपटीत स्प्राउट भेळची रेसिपी, अशी बनवा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sprout Bhel: वेट लॉसच नाही तर चवीचीही काळजी घेते चटपटीत स्प्राउट भेळची रेसिपी, अशी बनवा

Sprout Bhel: वेट लॉसच नाही तर चवीचीही काळजी घेते चटपटीत स्प्राउट भेळची रेसिपी, अशी बनवा

Apr 29, 2024 07:06 PM IST

Weight Loss Recipe: बहुतेक लोक वेट लॉस फूडच्या साध्या चवीमुळे त्यांना रुटीनमध्ये समाविष्ट करणे टाळतात. तुम्हीही हे असे करत असाल तर आता वेट लॉसची ही चटपटीत रेसिपी ट्राय करा. पाहा स्प्राउट भेळ कशी बनवावी

Sprout Bhel: वेट लॉसच नाही तर चवीचीही काळजी घेते चटपटीत स्प्राउट भेळची रेसिपी, अशी बनवा
Sprout Bhel: वेट लॉसच नाही तर चवीचीही काळजी घेते चटपटीत स्प्राउट भेळची रेसिपी, अशी बनवा

Sprout Bhel Recipe: जर तुम्ही तुमच्या वाढत्या वजनामुळे हैराण असाल आणि ते नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला हेल्दी वेट लॉस डाएटची मदत घ्यायची असेल तर ही प्रथिनेयुक्त रेसिपी तुमची मदत करू शकेल. बहुतेक लोक वेट लॉस फूडच्या फिक्या चवीमुळे ते खाणे किंवा आपल्या रुटीनमध्ये समाविष्ट करणे टाळतात. तुम्ही सुद्धा यामुळे वेट लॉस फूड घेत नसाल तर स्प्राउट भेळची ही टेस्टी रेसिपी ट्राय करा. स्प्राउट भेळ हा प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेला पॉवर पॅक्ड चटपटीत डायट आहे. न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून स्प्राउट्स भेळ बनवण्याची रेसिपी शेअर केली आहे. ही रेसिपी फक्त तुम्हाला आरोग्यच नाही तर चटपटीत चवही देते. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची स्प्राउट भेळ.

स्प्राउट भेळ बनवण्यासाठी साहित्य

- ४ चमचे मोड आलेले हिरवे मूग

- ४ चमचे मक्याचे दाणे

- ४ चमचे चिरलेली काकडी, टोमॅटो, गाजर

- मूठभर शेंगदाणे

- १ कप दही

- अर्धा टीस्पून चाट मसाला

- एका लहान लिंबाचा रस

- चवीनुसार मीठ

स्प्राउट भेळ बनवण्याची पद्धत

स्प्राउट भेळ बनवण्यासाठी प्रथम मोड आलेले हिरवे मूग, मक्याचे दाणे, चिरलेली काकडी, टोमॅटो, गाजर एका भांड्यात टाका आणि सर्व नीट मिक्स करा. यानंतर यात शेंगदाणे, चाट मसाला आणि मीठ घालून सर्व पुन्हा चांगले मिक्स करा. आता या स्प्राउट भेळवर लिंबाचा रस टाका. ही स्प्राउट भेळ दही आणि कोथिंबिरीने सजवा आणि सर्व्ह करा. तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप सुद्धा करू शकता.

Whats_app_banner