मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Aam Panna Recipe: उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करेल कैरीचं पन्हं, पोटाती उष्णताही कमी करेल ही रेसिपी

Aam Panna Recipe: उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करेल कैरीचं पन्हं, पोटाती उष्णताही कमी करेल ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 29, 2024 11:20 PM IST

Summer Special Recipe: उन्हाळ्यात कच्च्या कैरीपासून विविध पदार्थ बनवले जातात. त्यातील एक म्हणजे पन्हं. कैरीचं पन्हं फक्त टेस्टी नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहे. जाणून घ्या कैरीच्या पन्हंची रेसिपी.

Aam Panna Recipe: उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करेल कैरीचं पन्हं, पोटाती उष्णताही कमी करेल ही रेसिपी
Aam Panna Recipe: उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करेल कैरीचं पन्हं, पोटाती उष्णताही कमी करेल ही रेसिपी (freepik)

Kairi Panha Recipe: उन्हाळ्यातील उकाड्यापासून वाचण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या गोष्टींचा आहारात समावेश करतात. जे पोटातील उष्णता काढून शरीराला थंडावा देतात. अशाच एका उन्हाळी पेयाचे नाव आहे कैरीचे पन्हं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना कैरीच्या पन्हंची चव आवडते. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे ही चविष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. या समर ड्रिंकमुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या दूर होऊन शरीराला ताजेतवाने वाटते. इतकंच नाही तर ही समर स्पेशल रेसिपी अगदी कमी वेळात तयार करता येईल. चला तर मग जाणून घ्या टेस्टी कैरीचं पन्हं कसे बनवायचे.

ट्रेंडिंग न्यूज

कैरीचं पन्हं बनवण्यासाठी साहित्य

- ४ कैरी

- २ चमचे भाजलेल्या जिऱ्याची पावडर

- ६ टेबलस्पून गूळ किंवा साखर

- ३ चमचे काळे मीठ

- १ टेबलस्पून पुदिन्याची पाने

- मीठ चवीनुसार

कैरीचं पन्हं बनवण्याची पद्धत

कैरीचं पन्हं बनवण्यासाठी प्रथम कैरी नीट धुवून घ्या. प्रेशर कुकरमध्ये ठेवा आणि ४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. आता गॅस बंद करा आणि कुकरचे प्रेशर सुटल्यानंतरच झाकण उघडा. कैरी पाण्यातून बाहेर काढा. कैरी थंड झाल्यावर त्याचे साल हाताने काढून घ्या. हे सहज निघतात. आता कैरीचं गर एका भांड्यात काढून घ्या. आता कैरीचा गर हाताच्या मदतीने चांगले मॅश करा. आता त्यात बारीक चिरलेली पुदिन्याची पाने, किसलेला गूळ किंवा साखर, जिरे पूड, मिर पूड, काळे मीठ आणि चवीनुसार मीठ घालून सर्व काही चांगले मिक्स करा. 

आता हे तयार मिश्रण मिक्सरमध्ये टाका आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ब्लेंड करा. तुमचे टेस्टी कैरीचं पन्हं तयार आहे. तुम्ही हे थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवू शकता. किंवा सर्व्ह करताना ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकू शकता.

WhatsApp channel

विभाग