मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  मूळव्याधीचा त्रास असलेल्या लोकांसाठी या घरगुती टिप्स ठरतील फायदेशीर; वाचा फायदे

मूळव्याधीचा त्रास असलेल्या लोकांसाठी या घरगुती टिप्स ठरतील फायदेशीर; वाचा फायदे

May 21, 2022, 02:14 PM IST

    • Health Tips For Piles : बदलती जीवनशैली आणि असंतुलित आहारामुळं गेल्या काही वर्षात अनेक लोकांना मूळव्याधीचा सामना करावा लागत आहे.
Health Tips For Piles (HT)

Health Tips For Piles : बदलती जीवनशैली आणि असंतुलित आहारामुळं गेल्या काही वर्षात अनेक लोकांना मूळव्याधीचा सामना करावा लागत आहे.

    • Health Tips For Piles : बदलती जीवनशैली आणि असंतुलित आहारामुळं गेल्या काही वर्षात अनेक लोकांना मूळव्याधीचा सामना करावा लागत आहे.

Home Remedies For Piles : सध्याच्या काळात अनेक लोकांना मूळव्याधीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा आजार फार वेदनादायक असतो, त्यामुळं या समस्येवर लवकरात लवकर मात करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. मूळव्याधीचे दोन प्रकार असतात, पहिला मूळव्याधातून रक्त येणे आणि दुसरा गुदद्वाराभोवती खाज, जळजळ आणि वेदना होणं. अशा स्थितीत पिडित व्यक्तीला उठता-बसता अक्षरश: प्रचंड वेदनांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळं या आदारावर वेळीच उपचार होणं गरजेचं असतं.

ट्रेंडिंग न्यूज

World Laughter Day 2024: कामाच्या ठिकाणी हास्य कसे गेम चेंजर ठरू शकते? जागतिक हास्य दिन निमित्त जाणून घ्या

Heat Rash In Babies: वाढत्या गरमीमुळे लहान बाळांना घामोळ्या येतायत? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

Weight Loss: वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? मग, डाएटमध्ये आवर्जून सामील करा पपईच्या बिया! फायदे वाचाच...

Mango Papad: कैरीपासून बनवू शकता आंबट गोड आंब्याचे पापड, झटपट तयार होते सोपी रेसिपी

अनेकदा काही लोक या आजारापासून सुटका मिळावी म्हणून ऑपरेशन करण्याचा पर्याय निवडतात, परंतु काहींना ऑपरेशन केल्यानंतरही त्यापासून आराम मिळत नाही, त्यामुळं या व्याधीपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपाय करणं आवश्यक असतात. ते काय आहेत जाणून घेऊयात.

मूळव्याधापासून आराम मिळवण्यासाठी काय आहेत उपाय?

१. कोरफडीचं तेल मूळव्याधावर लावल्यानं त्यामुळं वेदना आणि त्या जागेवरची खाज कमी होण्यास मदत होते.

२. मूळव्याधीमुळं सूजलेल्या भागावर ऑलिव्ह ऑईल लावणं हे देखील फायदेशीर ठरतं, त्यामुळं सूजही कमी होण्यास मदत होते.

३. याशिवाय मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी जिरा आणि पाण्याची पेस्ट तयार करून त्या भागावर लावा, त्यामुळं वेदनेपासून सुटका होण्यास मदत होईल.

४. याशिवाय शिराळ्याचा रसदेखील या आजारावर गुणकारी मानला जातो. त्यासाठी शिराळा आणि कडूलिंबाचं तेलाची पेस्ट तयार करून ती मूळव्याध झालेल्या भागावर लावायला हवी, त्यामुळं ही समस्या कमी होते.

५. मूळव्याधीवर मात करण्यासाठी लिंबाचा रस आणि त्यात मध टाकून त्याचं सेवन करायाला हवं. त्यामुळं या समस्येपासून आराम मिळू शकतो.

६. याशिवा मूळव्याध झालेल्या जागेवर खोबरेल तेल लावल्यानं खाज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.

७. ताकात एक चमचा ओवा पावडर टाकून त्याचं सेवन केल्यानंदेखील या समस्येचा त्रास कमी होतो. याचं सेवन जेवणानंतर करायला हवं, हे लक्षात ठेवा.

८. त्याचबरोबर बर्फाचे काही छोटेछोटे तुकडे करून त्याला कापडात गुंडाळून मूळव्याध झालेल्या ठिकाणी १० मिनिटं लावल्यानं या आजारानं त्रस्त असलेल्या रुग्णाला आराम मिळू शकतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)