मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips : पायांची मालिश केल्यानं गायब होतात हे आजार, पाहा लिस्ट

Health Tips : पायांची मालिश केल्यानं गायब होतात हे आजार, पाहा लिस्ट

May 21, 2022, 12:42 PM IST

    • Massage The Soles Feet : अनेकजण आपल्या चेहऱ्याची किंवा केसांची नेहमीच काळजी घेत असतात, परंतु पायांच्या आरोग्याकडं आणि सुंदरतेकडं अनेकजण दुर्लक्ष करतात, असं करणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
Massage The Soles Feet (HT)

Massage The Soles Feet : अनेकजण आपल्या चेहऱ्याची किंवा केसांची नेहमीच काळजी घेत असतात, परंतु पायांच्या आरोग्याकडं आणि सुंदरतेकडं अनेकजण दुर्लक्ष करतात, असं करणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

    • Massage The Soles Feet : अनेकजण आपल्या चेहऱ्याची किंवा केसांची नेहमीच काळजी घेत असतात, परंतु पायांच्या आरोग्याकडं आणि सुंदरतेकडं अनेकजण दुर्लक्ष करतात, असं करणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

Massage The Soles Feet : सध्याच्या काळात अनेक लोकांना दिवसा शारीरिक कामं करावी लागतात. त्यामुळं त्यांचे पायही थकत असतात, परंतु व्यक्तीला अशा वेळेस काम महत्त्वाचं असल्यानं पायांकडं कुणीही लक्ष देत नाही. पायांकडं लक्ष देणं किंवा पाय सुंदर ठेवणं म्हणजे त्याची काळजी घेणं नाही तर त्यासाठी सातत्यानं पायांची मालिश करत राहणं म्हणजे पायांची काळजी घेणं होय. पायांची काळजी घेतली नाही तर व्यक्तीला अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. याशिवाय पायांच्या तळव्याची सातत्यानं मालिश केल्यास त्यामुळं व्यक्तीला अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते.

ट्रेंडिंग न्यूज

Weight Loss Tips: वजन कमी करायचं आहे? आहारात अशा प्रकारे करा लिंबाचा समावेश, होईल फायदा

Marathi Rajbhasha Din 2024: मराठी राजभाषा भाषा दिनानिमित्त प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा!

Karela Sabji Recipe: कडू कारल्याची भाजी सुद्धा सगळे खातील आवडीने, फक्त बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी

Skin Care Routine: उन्हाळ्यात सावळ्या त्वचेची अशी घ्या काळजी, या रुटीनने ग्लो करेल चेहरा

पायांच्या तळव्याची मालिश केल्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे?

अनेक लोकांना बदलत्या जीवनशैलीमुळं आणि असंतुलित आहारामुळं वाढत्या रक्तदाबाच्या समस्येचा सामना करावा लागत असतो. त्यामुळं या समस्येनं ग्रस्त असणाऱ्या लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी पायांची मालिश करायला हवी. त्यामुळं रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय हार्ट अटॅकचा धोका कमी होऊन रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

पायांची सूज कमी होण्यास होते मदत...

जेव्हा महिला या गरोदर असतात तेव्हा त्यांच्या पायांना सूज येण्याची शक्यता असते. अशा वेळेस महिलांच्या पायांची टाच आणि घोटे दुखायला लागतात. त्यासाठी पायांच्या तळव्याची मालिश केल्यास त्यामुळं पायांची सूज कमी होण्यास मदत होते.

मासिक पाळीचा त्रास कमी होतो...

मासिक पाळीच्या काळात महिलांना अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागत असतं. त्यात मासिक पाळीमुळं मूड स्विंग होणं, पोट दुखणं, भीती वाटणं, झोप न येणं किंवा डोकेदुखीची समस्या महिलांना उद्भवत असतात, त्यामुळं अशा वेळेस पायांची मालिश केल्यास या समस्या कमी होण्यास मदत होते. याशिवाय मासिक पाळीच्या काळात वेदना कमी होतात.

त्याचबरोबर ज्या लोकांना सतत घाम येण्याची किंवा चक्कर येण्याची समस्या असते, त्या लोकांनाही पायांची मालिश केल्यानं आराम मिळू शकतो. त्यासाठी दररोज संध्याकाळी किंवा सकाळी नियमितपणे पायांची मालिश करायला हवी.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)