मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Explainer : घराबाहेर राहणाऱ्या महिला सेक्स करण्यात पुरुषांच्या पुढे-रिपोर्ट

Explainer : घराबाहेर राहणाऱ्या महिला सेक्स करण्यात पुरुषांच्या पुढे-रिपोर्ट

May 21, 2022, 10:41 AM IST

    • Sexual Health Of Women : भारतात सेक्स लाईफबद्दल बोलणं नेहमी टाळलं जातं. महिला आणि पुरुष या दोघांच्या बाबतीतही तसंच आहे. परंतु आता घरापासून दूर असणाऱ्या महिलांच्या सेक्स लाईफबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Sexual Health Of Women (HT)

Sexual Health Of Women : भारतात सेक्स लाईफबद्दल बोलणं नेहमी टाळलं जातं. महिला आणि पुरुष या दोघांच्या बाबतीतही तसंच आहे. परंतु आता घरापासून दूर असणाऱ्या महिलांच्या सेक्स लाईफबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे.

    • Sexual Health Of Women : भारतात सेक्स लाईफबद्दल बोलणं नेहमी टाळलं जातं. महिला आणि पुरुष या दोघांच्या बाबतीतही तसंच आहे. परंतु आता घरापासून दूर असणाऱ्या महिलांच्या सेक्स लाईफबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे.

Sexual Health Of Women In India : भारतात अजूनही सेक्सबद्दल उघडपणे बोललं जात नाही. अनेकदा हा विषय निघाल्यावर लोक त्याला टाळण्याचा प्रयत्न करतात. कुटुंब, सार्वजनिक ठिकाणं किंवा शिक्षणातल्या अभ्यासक्रमांमध्येही याबाबत फारसं बोललं जात नसल्यानं महिला आणि पुरुषांना याबाबत फारशी माहिती नसते, परंतु कामानिमित्त घरापासून दूर राहत असलेल्या किंवा स्थायिक झालेल्या महिलांची सेक्स लाईफ कशी असते, याबाबत तुम्ही कधी विचार केलाय का, नॅशनल फॅमिली हेल्थने जारी केलेल्या एका अहवालात याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

World Asthma Day 2024: वायू प्रदूषणामुळे वाढतोय दम्याचा त्रास, जाणून घ्या कसे करावे व्यवस्थापन

Parenting Tips: शिक्षण सुधारणांमध्ये सूक्ष्म-शालेय शिक्षणाची भूमिका काय आहे? जाणून घ्या

Summer Essentials: उन्हाळ्यात दिसायचे आहे कूल आणि स्टायलिश? तुमच्याजवळ नक्की ठेवा या ५ प्रकारचे ड्रेस

Mother's Day 2024: यावर्षी कधी आहे मदर्स डे? जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस

काय सांगितलंय रिपोर्टमध्ये?

महिलांनी त्यांच्या पार्टनशरशिवाय घरातल्या इतर पुरुषांशी किंवा बाहेरच्या पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवल्यास त्यांना एचआयव्हीचा संसर्ग होण्याचा धोका वाढत असतो. नॅशनल फॅमिली हेल्थनं केलेल्या या सर्वेक्षणात १५ ते ४९ या वयोगटातील महिलांना त्यांच्या सेक्स लाईफबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात ०.३ टक्के महिलांनी एकापेक्षा अधिक पुरुषांशी लैंगिक संबंध असल्याचं मान्य केलं आहे. याशिवाय ४ टक्के पुरुषांनी त्यांची पत्नी अथवा घरात राहणाऱ्या महिला जोडीदाराशिवाय इतर महिलांशी शारीरिक संबंध ठेवल्याचं सांगितलं.

घरापासून दूर राहणाऱ्या महिलांची स्थिती काय?

काही महिला या कामानिमित्त किंवा नोकरीसाठी घरापासून दूर राहत असतात, अशावेळी या महिला एकापेक्षा अधिक पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवण्याची शक्यता असते, या संशोधनात हा कल सुशिक्षित आणि श्रीमंत भारतीय महिलांमध्ये जास्त दिसून आला. याशिवाय घरापासून दूर राहणाऱ्या महिला या महिन्यातून सरासरी सात दिवस सेक्ससाठी वेळ देत असल्याचंही या संशोधनातून समोर आलं आहे.

<p>Sexual Health Of Women In India</p>

घराबाहेर राहिल्यामुळं महिलांच्या सेक्स लाईफवर काय प्रभाव पडतो?

जेव्हा महिला या घरापासून दूर राहत असतात, तेव्हा त्यांची सेक्स लाईफ पूर्णत: बदलत असते. घरातून बाहेर पडल्यावर महिला पुरुषांपेक्षा जास्त सेक्स करतात, जेव्हा महिला या घरापासून दूर असतात तेव्हा त्यांची लैंगिक भागीदारांची संख्या सरासरी १.७ च्या तुलनेत २.३ पर्यंत वाढल्याचं आढळलं. याशिवाय ५६ टक्के अविवाहित मुलींनी लग्नाआधी घराबाहेर राहत असल्यानं नियमित सेक्स करत असल्याचं सांगितलं. या तुलनेत जेव्हा पुरुष काही कामानिमित्त घराबाहेर असतात तेव्हा त्यांचं सेक्स करण्याचं प्रमाण हे ३२ टक्के इतकं आहे.

महिला आणि पुरुषांचे सेक्सबद्दलचे वेगवेगळे अनुभव...

महिला आणि पुरुषांचे सेक्स करण्याबद्दलचे अनुभव फार वेगवेगळे असतात. कारण महिला जेव्हा घराबाहेर असतात तेव्हा ते जास्त सेक्स करतात तर पुरुषांमध्ये याचं प्रमाण फार कमी आहे. पैसे देऊन लैंगिक संबंध ठेवण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये ५३ टक्के आहे, तर महिलांमध्ये हे प्रमाण केवळ ३ टक्के असल्याचंही या संशोधनात सांगण्यात आलं आहे.

महिला का असतात इतक्या सेक्शुअली एक्टिव?

भारतीय समाज हा पुरुषसत्ताक समाज मानला जातो. त्यामुळं अनेक मुली आणि महिला या कमीत वयातच लैंगिक छळाच्या बळी ठरतात. भारतात ३ टक्के मुलींवर २२ व्या वर्षीच बलात्कार करण्यात येत असल्याची धक्कादायक माहितीही या सर्वेक्षणातून समोर आली आहे. याशिवाय याला भारतातील 'मुलं ही देवाघरची फुलं' ही श्रद्धाही कारणीभूत ठरत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारतातील हवामान उष्ण आणि दमट असल्यानं देशातील मुली या लवकर वयात येत असल्यानं त्यांची सेक्सबद्दलची उत्सुकता वाढते.

<p>Sexual Health Of Women</p>

समोर आलेल्या या सर्वेक्षणात पहिल्यांदा सेक्स करणाऱ्या अशिक्षित मुलीचं सरासरी वय १७.५ इतकं होतं. तर सुशिक्षित मुलींमध्ये हे प्रमाण २२.८ टक्के इतकं आहे. त्यामुळं आता समोर आलेल्या या रिपोर्टमध्ये भारतातल्या मुलींना या मुलांच्या तुलनेत सेक्सबद्दल अधिक रुची आणि जागरुक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)