मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Skin Care: उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा चंदन आणि त्वचेच्या समस्यांना करा बाय बाय!

Summer Skin Care: उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा चंदन आणि त्वचेच्या समस्यांना करा बाय बाय!

Mar 09, 2023, 12:05 PM IST

    • Skin Care With Sandalwood: उष्णता वाढायला लागली तसे शरीरासोबतच त्वचेला देखील थंडावा देणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही चंदन वापरु शकता. जाणून घ्या त्याचे फायदे.
त्वचेसाठी चंदनाचे फायदे (HT)

Skin Care With Sandalwood: उष्णता वाढायला लागली तसे शरीरासोबतच त्वचेला देखील थंडावा देणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही चंदन वापरु शकता. जाणून घ्या त्याचे फायदे.

    • Skin Care With Sandalwood: उष्णता वाढायला लागली तसे शरीरासोबतच त्वचेला देखील थंडावा देणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही चंदन वापरु शकता. जाणून घ्या त्याचे फायदे.

Benefits of Sandalwood for Skin in Summer: उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या ऋतूमध्ये त्वचेवर पुरळ, लालसरपणा, पिंपल्स येण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत प्रत्येकजण आपली त्वचा उष्णतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो. काही लोक कूलिंग थेरपी घेतात, तर काही लोक कूलिंग प्रोडक्ट्स वापरतात. अशा परिस्थितीत चंदन लावणे सर्वात फायदेशीर ठरू शकते. कारण त्यात असलेले गुणधर्म त्वचेच्या समस्या दूर करतात, तसेच त्वचेला थंडावा देतात. चंदनामुळे त्वचा मऊ आणि ग्लोइंग तर होतेच शिवाय त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. चला जाणून घेऊया चंदन लावण्याचे फायदे.

ट्रेंडिंग न्यूज

Watermelon Usage For Skin: चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणायची असेल तर अशा प्रकारे वापरा टरबूज!

Rice Flour Poori: बनवा खुसखुशीत मसालेदार तांदळाची पुरी, जाणून घ्या सोपी रेसिपी!

joke of the day : मी तुझा जीव घेईन, या वाक्याचं इंग्रजी भाषांतर जेव्हा गुरुजी विचारतात…

Life Mantra: तुम्हाला जीवनात आनंद हवा आहे का? लगेच या सवयी पूर्णपणे सोडा, फरक दिसेल

मुरुमांपासून सुटका

चंदनाची पेस्ट चेहऱ्यावरील मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करते. एवढेच नाही तर मुरुमांमुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सूजवरही चंदनाची पेस्ट प्रभावी आहे. 

त्वचेच्या नुकसानापासून बचाव करते 

कडक सूर्यप्रकाशामुळे त्वचा खराब होऊन काळी पडू लागते. काही वेळा मुरुम निघून जातात पण त्यांचे हट्टी डाग राहतात. अशा स्थितीत चंदनाचा चमत्कारिक प्रभाव दिसून येतो. यासाठी चंदन पावडरमध्ये चिमूटभर हळद आणि थोडे दूध घालून पेस्ट बनवा. आता ते चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने धुवा.

टॅनिंगसाठी

उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या सामान्य आहे. अशावेळी चंदनाची पेस्ट लावणे फायदेशीर ठरते. कारण ते टॅनिंगला प्रतिबंध करते. चंदनामध्ये अँटी-टॅनिंग गुणधर्म असतात, जे त्वचेला टॅनिंगपासून वाचवतात. यासाठी चंदन पावडर, मध, लिंबाचा रस आणि दही मिक्स करा. आता ही पेस्ट प्रभावित भागावर लावा आणि १५ मिनिटांनी धुवा.

स्किनला ठेवते हायड्रेटेड

त्वचा हायड्रेटेड नसल्यामुळे कोरडी होऊ लागते. चंदनामध्ये आढळणारे तेल त्वचेचा कोरडेपणा दूर करते. यासाठी चंदनाच्या पावडरमध्ये दोन चमचे गुलाबजल मिक्स करुन पेस्ट तयार करा.

एजिंगची लक्षणे कमी करते

चंदनामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात, जे त्वचा तरुण ठेवण्यास मदत करतात .चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर करण्यासाठी चंदनाची पेस्ट फायदेशीर ठरते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग