मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Coffee Facial: घरच्या घरी या ३ स्टेप्सने करा कॉफी फेशियल, मिळेल पार्लरसारखा ग्लो

Coffee Facial: घरच्या घरी या ३ स्टेप्सने करा कॉफी फेशियल, मिळेल पार्लरसारखा ग्लो

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 04, 2023 02:45 PM IST

Skin Care Tips: कॉफीचा वापर त्वचेचा रंग सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो. तुम्ही कॉफी वेगवेगळ्या प्रकारे चेहऱ्यावर लावू शकता. कॉफीचे फेशियल कसे करायचे ते जाणून घ्या.

कॉफी फेशियल
कॉफी फेशियल (freepik)

Coffee Facial at Home: कॉफीच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी फेशियल करू शकता. हे त्वचा पूर्णपणे स्वच्छ करेल आणि तुमचे सौंदर्य आणखी खुलवेल. इंस्टंट ग्लोइंग स्किन मिळविण्यासाठी तुम्ही घरीच कॉफी फेशियल करू शकता. हे फेशियल करणे खूप सोपे आहे आणि तुम्ही हे फेशियल फक्त ३ स्टेप्स मध्ये करू शकता. येथे पाहा कॉफी फेशियल करण्याच्या सोप्या पद्धती-

कॉफी फेशियल करण्याच्या सोप्या स्टेप्स

पहिली स्टेप

फेशियल करताना पहिल्या टप्प्यात चेहरा स्वच्छ करा. यासाठी कच्च्या दुधात कॉफी पावडर मिक्स करा. आता त्यात कॉटन बॉल बुडवा आणि हळूवारपणे त्वचेवर लावा. आता सर्कुलर मोशनमध्ये हातांनी मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

दुसरी स्टेप

फेशियलची दुसरी स्टेप म्हणजे स्क्रबिंग. यासाठी तुम्ही कॉफी पावडरमध्ये बारीक तांदळाचे पीठ मिक्स करा. ते चांगले मिसळा आणि नंतर थोडे थोडे घेऊन चेहऱ्यावर लावा. सर्कुलर मोशनमध्ये स्क्रब करा. मधे थोडे थोडे पाणी घेऊन नीट स्क्रब करा.

तिसरी स्टेप

ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे. फेस मास्क बनवण्यासाठी कॉफी पावडरमध्ये चंदन पावडर आणि मध मिक्स करा. आता हा फेस पॅक संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. हा पॅक साधारण १८ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर हा पॅक पाण्याने धुवा. हा पॅक काढून टाकल्यानंतर तुम्ही चेहऱ्याला सीरम लावू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग