मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: नॅचरल ग्लो मिळवण्यासाठी प्रभावी आहे हे योगासन, खुलेल सौंदर्य

Yoga Mantra: नॅचरल ग्लो मिळवण्यासाठी प्रभावी आहे हे योगासन, खुलेल सौंदर्य

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 05, 2023 08:37 AM IST

Yoga for Skin: योगासन फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या स्किनसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. हे काही योगासन तुमचे नैसर्गित सौंदर्य खुलवेल.

उत्तानासन
उत्तानासन (freepik)

Yoga Poses to Get Natural Glow: चेहऱ्यावरील पिंपल्स, एक्ने व्यक्तीचे नैसर्गिक सौंदर्य खराब करते. त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होऊन नॅचरल ग्लो मिळवण्यासाठी लोक कितीतरी गोष्टी करत असतात. बाजारात मिळणारे विविध महागडे प्रोडक्ट देखीस वापरतात. त्यामुळे अनेक वेळा चेहऱ्यावर फायदा होण्याऐवजी नुकसान होतो. जर तुमच्या चेहऱ्याचे नॅसर्गिक सौंदर्यही लपलेले असेल, तर समस्यांपासून मुक्त त्वचा मिळवण्यासाठी या योगासनांचा तुमच्या रुटीनमध्ये समावेश करा.

प्राणायाम

प्राणायामाद्वारे श्वासावर नियंत्रण ठेवता येते. असे केल्याने तणाव दूर होतो. शरीराची उर्जा वाढते आणि शरीरात अधिक ऑक्सिजन पोहोचतो, ज्यामुळे शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर पडतात. ज्यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात आणि शरीरात ब्लड सर्कुलेशन देखील चांगले होते. यामुळे त्वचेचे पिंपल्स दूर होतात आणि त्वचा सुधारते.

कपालभाती

कपालभाती पोटासाठी खूप फायदेशीर आहे. असे केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. कपालभातीमुळे पचनक्रिया सुधारून रक्ताभिसरणही सुधारते. असे केल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. कपालभातीच्या रोजच्या सरावाने त्वचा मुरुम मुक्त आणि सुंदर बनते.

उत्तानासन

उत्तानासनामुळे शरीर ताणून लिव्हर आणि किडनीही निरोगी राहते. कधी-कधी जास्त ताण घेतल्याने चेहऱ्यावर मुरुमे येतात, अशा परिस्थितीत उत्तानासन तणाव कमी करून हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करते. ज्यामुळे मुरुमांपासून सुटका होते.

 

बालासन

जर तुम्ही नेहमी तणावाखाली असाल तर तुम्हाला मुरुमे होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत बालासन करणे फायदेशीर ठरू शकते. बालासन तणाव आणि चिंता दूर करून हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग