मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chinese Bhel: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा क्रंची चायनीज भेळ, सोपी आहे ही स्ट्रीट स्टाईल रेसिपी

Chinese Bhel: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा क्रंची चायनीज भेळ, सोपी आहे ही स्ट्रीट स्टाईल रेसिपी

Jun 03, 2023, 07:11 PM IST

    • Street Style Recipe: संध्याकाळी काहीतरी चटपटीत चाट खायची इच्छा असेल तर यावेळी ट्राय करा चायनीज भेळ. स्ट्रीट स्टाईल ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.
क्रंची चायनीज भेळ

Street Style Recipe: संध्याकाळी काहीतरी चटपटीत चाट खायची इच्छा असेल तर यावेळी ट्राय करा चायनीज भेळ. स्ट्रीट स्टाईल ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.

    • Street Style Recipe: संध्याकाळी काहीतरी चटपटीत चाट खायची इच्छा असेल तर यावेळी ट्राय करा चायनीज भेळ. स्ट्रीट स्टाईल ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.

Cruncy Chinese Bhel Recipe: संध्याकाळी चहासोबत स्नॅक्स खायला सगळ्यांनाच आवडते. यावेळी काहीतरी चटपटीत चाट सुद्धा आवडीने खाल्ले जाते. तुम्हाला सुद्धा असेच काही खायची इच्छा असेल तर तुम्ही चायनीज भेळची ही रेसिपी ट्राय करू शकता. क्रंची, स्पायसी, चटपटीत चायनीज भेळ बनवायला खूप सोपी आहे. या चायनीज डिशमध्ये पारंपारिक भेळचा ट्विस्ट लहान मुलांसोबतच मोठ्यांना सुद्धा आवडेल. चला तर मग वाट कसली पाहत आहात, जाणून घ्या कशी बनवायची ही टेस्टी आणि क्रंची चायनीज भेळ.

ट्रेंडिंग न्यूज

Potato Bhaji Recipe: दुपारच्या जेवणात काही वेगळं खायचं असेल तर ट्राय करा दही बटाट्याच्या भाजीची रेसिपी

Multani Mitti for Skin: उन्हाळ्यात चेहऱ्यावर अशा प्रकारे लावा मुलतानी माती, त्वचेला मिळेल थंडावा

joke of the day : प्रेमात सपशेल अपयशी ठरलेला प्रियकर जेव्हा प्रेयसीच्या लग्नाला जातो…

Press Freedom Day 2024: का साजरा केला जातो प्रेस फ्रीडम डे, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

चायनीज भेळ बनवण्यासाठी साहित्य

- १ वाटी नूडल्स

- १ कांदा (उभे काप केलेले)

- १ कप कोबी (बारीक चिरलेली)

- १/२ सिमला मिरची (बारीक चिरलेली)

- १ गाजर (बारीक चिरलेला)

- ३ ते ४ पाकळ्या लसूण (बारीक चिरलेला)

- दीड टीस्पून सोया सॉस

- १ टेबल स्पून शेजवान सॉस

- १ टेबल स्पून टोमॅटो सॉस

- १/२ टीस्पून व्हिनेगर

- १/४ टीस्पून काळी मिरी पूड

- रिफाइंड ऑइल (तळण्यासाठी)

- मीठ (चवीनुसार)

चायनीज भेळ बनवण्याची पद्धत

क्रंची व चटपटीत चायनीज भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम एक मोठ्या भांड्यात काही थेंब रिफाइंड तेल टाकून पाणी उकळून घ्या. पाणी उकळल्यानंतर त्यात थोडेसे मीठ आणि नूडल्स टाका. साधारण ५ ते ७ मिनीट नूडल्स उकळा. आता या पाण्यातून नूडल्स काढून घ्या आणि एक वेळा थंड पाण्याने धुवून घ्या. कढईमध्ये तेल गरम करा आणि मध्यम आचेवर नूडल्स कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

आता एका दुसऱ्या पॅनमध्ये २ टेबल स्पून रिफाइंड ऑइल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात लसूण टाका आणि १ ते २ मिनीट परतवा. आता लांब चिरलेला कांदा, सिमला मिरची, गाजर, कोबी या सर्व भाज्या टाकून ५ मिनीट फ्राय करा. आता यात सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि शेजवान सॉस टाकून नीट मिक्स करून घ्या आणि गॅस बंद करा. आता हे सर्व भाज्यांचे मिश्रण फ्राइड नूडल्समध्ये टाका आणि नीट मिक्स करून घ्या. तुमची क्रंची चायनीज भेळ तयार आहे. संध्याकाळी भूक भागवण्यासाठी आणि चटपटीत खायची क्रेविंग कमी करण्यासाठी बेस्ट आहे.