मराठी बातम्या  /  Lifestyle  /  How To Make Tasty Potato Kofta Curry Recipe At Home

Kofta Curry Recipe: लंच मध्ये बनवा बटाटा कोफ्ता करी, पुरी किंवा पराठ्यासोबत टेस्टी लागते ही रेसिपी

बटाटा कोफ्ता करी
बटाटा कोफ्ता करी
Hiral Shriram Gawande • HT Marathi
Jun 03, 2023 12:40 PM IST

Recipe for Lunch: लहान असो वा मोठे सगळ्यांना बटाटा खायला आवडतो. नेहमीची भाजी न करता तुम्ही बटाट्याचे कोफ्ता करी बनवू शकता. पाहा ही रेसिपी.

Potato Kofta Curry Recipe: जर तुम्हालाही दुपारच्या जेवणात काहीतरी चांगले आणि चटपटीत खाण्याची इच्छा असेल, तर पुरी किंवा पराठ्यासोबत बटाटा कोफ्ता करी ट्राय करा. ही रेसिपी फक्त खायला टेस्टी नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे ते मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच खायला आवडेल. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घ्या बटाटा कोफ्ता करी कशी बनवायची.

ट्रेंडिंग न्यूज

बटाटा कोफ्ता करी बनवण्यासाठी साहित्य

- बटाटे उकळलेले

- बेसन

- ४ कांदे

- ४ टोमॅटो

- २ हिरव्या मिरच्या

- १ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर

- ३/४ कप क्रीन

- १ इंच आल्याचा तुकडा

- १/२ टीस्पून जिरे

- १/४ टीस्पून लाल तिखट

- १/४ टीस्पून हळद

- १ टीस्पून धने पावडर

- १/२ टीस्पून गरम मसाला

- चवीनुसार मीठ

- तेल आवश्यकतेनुसार

बटाटा कोफ्ता करी बनवण्याची पद्धत

बटाट्याचे कोफ्ते बनवण्यासाठी प्रथम उकडलेले बटाटे किसून घ्या आणि एका भांड्यात ठेवा. त्यात बेसन, मीठ, हळद, लाल तिखट आणि धणे पूड घाला. आता बटाट्याचे मिश्रण हातात घेऊन त्याचे गोळे बनवा. कढईत तेल गरम करून हे बटाट्याचे गोळे हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्या आणि प्लेटमध्ये काढा.

आता बटाट्याच्या कोफ्त्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. यानंतर क्रीम चांगले फेटून बाजूला ठेवा. आता एका कढईत थोडे तेल टाकून मंद आचेवर गरम करून त्यात जिरे आणि कांदे घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. यानंतर त्यात हिरवी मिरची, टोमॅटो, आले घालून ४-५ मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात धने पूड, लाल तिखट, हळद घाला. मसाले चांगले भाजून झाल्यावर गॅस बंद करा. मसाले थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या.

आता पुन्हा एकदा कढईत तेल गरम करून त्यात तयार मसाला आणि क्रीम घालून मिक्स करा. ग्रेव्हीला तेल सुटायला लागल्यावर पॅनमध्ये दोन कप पाणी टाका आणि त्यात मीठ घालून उकळी येईपर्यंत शिजवा. यानंतर त्यात आधी तळलेले कोफ्ते टाका आणि साधारण २ मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा. तुमची टेस्टी बटाटा कोफ्ता करी तयार आहे. कोथिंबीर आणि क्रीमने गार्निश करा आणि पुरी किंवा पराठ्यासोबत गरमा गरम सर्व्ह करा.