Masala Khichdi: रात्रीच्या जेवणात हलकं खायचंय? बनवा टेस्टी आणि हेल्दी मसाला खिचडी
Dinner Special Recipe: रात्रीच्या जेवणात तुम्ही अनेक वेळा खिचडी, पुलाव, बिर्याणी असे प्रकार खाल्ले असतील. काहीतरी हलकं फुलकं खायची इच्छा असेल तर साध्या खिचजीऐवजी ट्राय करा ही मसाला खिचडीची रेसिपी.
Tasty and Healthy Masala Khichadi Recipe: उन्हाळ्यात रोज मसालेदार जेवण केल्याने पचनाच्या, पोटाच्या समस्या होऊ शकतात. शिवाय अनेकांना जळजळ सुद्धा होते. अशा वेळी रात्री काहीतरी साधेसे, हलके-फुलके खायची इच्छा होते तेव्हा पहिले खिचडीचा विचार केला जातो. अनेक लोक खिचडीला आजारी असतानाचे जेवण मानतात. परंतु खिचडी प्रत्येकासाठी खूप फायदेशीर आहे आणि आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. चला, जाणून घ्या मसाला खिचडी बनवण्याची रेसिपी
ट्रेंडिंग न्यूज
मसाला खिचडी बनवण्यासाठी साहित्य
- १०० ग्रॅम बासमती तांदूळ
- ५० ग्रॅम मूग डाळ
- १/२ कप हिरवे वाटाणे
- १/२ कप फुलकोबी (बारीक चिरलेली)
- १/४ कप सिमला मिरची (बारीक चिरलेली)
- १ बटाटा (चिरलेला)
- १ टोमॅटो (बारीक चिरलेला)
- २ ते ३ टीस्पून तेल किंवा तूप
- कोथिंबीर (बारीक चिरलेली)
- १/२ टीस्पून जिरे
- हिंग
- १/४ टीस्पून हळद
- १/२ इंच आल्याचा तुकडा (बारीक चिरलेला)
- २ हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
- १/४ टीस्पून लाल तिखट
- १/४ टीस्पून गरम मसाला
- चवीनुसार मीठ
- खडा मसाला - ७ काळी मिरी आणि २ लवंगा (जाडसर बारीक करून)
मसाला खिचडी बनवण्याची पद्धत
मसाला खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम बासमती तांदूळ आणि मूंग डाळ चांगले धुवून अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा. अर्ध्या तासानंतर कुकरमध्ये तांदूळ, डाळ आणि अडीच कप पाणी टाकून उकळण्यासाठी ठेवा. १ शिटी होईपर्यंत शिजू द्या. यानंतर गॅस बंद करून त्यात डाळ तांदूळ कुकरचा प्रेशर सुटेपर्यंत शिजू द्या. खिचडी बनवण्यासाठी भाजीही शिजवावी लागते, त्यासाठी एका पॅनमध्ये २ चमचे तेल टाकून गरम करा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुप सुद्धा वापरू शकता. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे टाका. त्याच बरोबर गॅस मंद करून पॅनमध्ये हिंग, हळद, आले, हिरवी मिरची आणि खडे मसाले टाकून परतून घ्या. आता या मसाल्यात बटाटे घालून थोडे कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. भाजलेल्या बटाट्यामध्ये फ्लॉवर आणि वाटाणे १ मिनिट क्रंची होईपर्यंत शिजवा. नंतर त्यात सिमला मिरची टाकून १ मिनिट परतून घ्या. भाजी भाजल्यावर त्यात १ कप पाणी, मीठ, तिखट आणि गरम मसाला टाकून मिक्स करा. अजून १ कप पाणी टाका. दरम्यान, कुकरमध्ये डाळ तांदळाची खिचडी शिजली जाईल. प्रेशर संपताच, सर्वप्रथम डाळ आणि भात चांगला शिजला आहे की नाही हे तपासा.
भाज्यांमध्ये आणखी १ कप पाणी घालून उकळू द्या. उकळी आल्यावर पॅनमध्ये डाळ आणि तांदूळ घालून मिक्स करा. खिचडी खूप घट्ट वाटली तर थोडे जास्त पाणी घालून १ ते २ मिनिटे शिजवा. तुमची मसाला खिचडी रेडी आहे. आता यात वरून कोथिंबीरने गार्निश करा. प्लेट मध्ये काढून वरून तुप टाका. याने टेस्ट आणखी वाढते. मसाला खिचडी सोबत पापड, दही, लोणचं आणि चटणी सर्व्ह करू शकता.
विभाग