मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rava Appe Recipe: नाश्त्यात बनवा रवा आप्पे, झटपट होतात तयार!

Rava Appe Recipe: नाश्त्यात बनवा रवा आप्पे, झटपट होतात तयार!

Mar 15, 2023, 11:37 AM IST

    • Healthy Snacks Recipe: जर तुम्हालाही दिवसाची सुरुवात चवदार आणि आरोग्यदायी नाश्त्याने करायची असेल, तर रवा आप्पे एक परिपूर्ण खाद्यपदार्थ आहे.
South Indian Recipe (Freepik)

Healthy Snacks Recipe: जर तुम्हालाही दिवसाची सुरुवात चवदार आणि आरोग्यदायी नाश्त्याने करायची असेल, तर रवा आप्पे एक परिपूर्ण खाद्यपदार्थ आहे.

    • Healthy Snacks Recipe: जर तुम्हालाही दिवसाची सुरुवात चवदार आणि आरोग्यदायी नाश्त्याने करायची असेल, तर रवा आप्पे एक परिपूर्ण खाद्यपदार्थ आहे.

Tea Time and Breakfast Recipe: दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांच्या शौकीन लोकांनी आप्पे चाखलेच असतील. इडली-डोशाप्रमाणेच आप्पेही आवडणाऱ्यांची यादी मोठी आहे. पारंपारिक आप्पे तर अनेकांना आवडतातच पण रव्यापासून बनवलेले आप्पे देखील मोठ्या थाटामाटात खाल्ले जाते. हे सकाळी नाश्त्यात किंवा संध्याकाळी स्नॅक म्हणून सर्व्ह केले जाऊ शकते. रवा आप्पे डिशची खासियत म्हणजे लहान मुले असोत वा प्रौढ, सर्वजण ते मोठ्या उत्साहाने खातात.रवा आप्पे बनवण्यासाठी रव्यासोबत भाजीचाही वापर केला जातो, ज्यामुळे हा पदार्थ चवदार आणि आरोग्यदायी बनतो. जर तुम्हालाही दिवसाची सुरुवात चवदार आणि आरोग्यदायी नाश्त्याने करायची असेल, तर रवा आप्पे एक परिपूर्ण खाद्यपदार्थ आहे. हे बनवायला खूप सोपे आहे आणि सकाळच्या गर्दीत कमी वेळेत सहज तयार करता येते. चला जाणून घेऊया रवा आप्पे बनवण्याची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

Honey Eating: आरोग्यासाठी फायदेशीर आहे मध, तुम्हाला माहीत आहे का ते खाण्याची योग्य पद्धत?

Health Care Tips: पूर्ण दिवस एसीमध्ये राहता का? सावधान! यामुळे होऊ शकतात हे मोठे आजार

Potato Bhaji Recipe: दुपारच्या जेवणात काही वेगळं खायचं असेल तर ट्राय करा दही बटाट्याच्या भाजीची रेसिपी

Multani Mitti for Skin: उन्हाळ्यात चेहऱ्यावर अशा प्रकारे लावा मुलतानी माती, त्वचेला मिळेल थंडावा

रवा आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

रवा - १/२ किलो

दही - २५० ग्रॅम

आले पेस्ट - १ टीस्पून

लसूण पेस्ट - १ टीस्पून

हिरवी मिरची चिरलेली - ३-४

कांदा - १

मोहरी - १ टीस्पून

हळद - १/२ टीस्पून

जिरे - १ टीस्पून

सिमला मिरची - १

गाजर - २ (पर्यायी)

टोमॅटो - १

तीळ - १ टीस्पून

गरम मसाला - १/२ टीस्पून

कोथिंबीर - १ टीस्पून

तेल - २ चमचे

मीठ - चवीनुसार

रवा आप्पे कसे बनवायचे?

रवा आप्पे बनवण्यासाठी प्रथम रवा स्वच्छ करून एका मोठ्या भांड्यात ठेवा. आता बाऊलमध्ये दही घाला आणि दही रवा बरोबर मिक्स करा. आता या मिश्रणात सुमारे २ कप पाणी घालून चांगले फेटा आणि घट्ट पेस्ट तयार करा. तयार पेस्ट झाकून १५ मिनिटे बाजूला ठेवा. आता गाजर, टोमॅटो, सिमला मिरची, हिरवी मिरची यांचे बारीक तुकडे करा. आता कढईत २ चमचे तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि जिरे टाकून ते तडतडत नाही तोपर्यंत तळून घ्या. यानंतर कढईत आलं पेस्ट आणि लसूण पेस्ट घाला आणि तळून घ्या. नंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून बारीक चिरलेला कांदा घाला. आता कांद्याचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता.

यानंतर त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची आणि चिरलेली गडर घाला आणि ढवळत असताना शिजवा. थोड्या वेळाने चिरलेला टोमॅटो घालून सर्व साहित्य मऊ होईपर्यंत तळून घ्या. गॅस वाढवा आणि भाज्या २ मिनिटे शिजवा. भाज्या मऊ झाल्यावर त्यात हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ एकत्र करून आणखी १ मिनिट शिजवा. नंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.

भाज्यांचे मिश्रण थंड झाल्यावर रव्याच्या पिठात घालून चांगले मिसळा. आता थोडे अख्खे जिरे, चवीनुसार मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. आता आप्पे बनवण्यासाठी एक भांडे घ्या आणि त्यात थोडे तेल आणि मोहरी टाका. यानंतर सर्व खणांमध्ये आप्पेचे पीठ भरून भांडे बंद करून २-३ मिनिटे शिजवा. नंतर झाकण उघडा, अप्पे उलटा आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा २-३ मिनिटे शिजवा. चविष्ट सूजी अप्पे तयार आहे. नाश्त्यात त्यांना चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.