मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kababs Recipe: स्नॅक्समध्ये बनवा प्रोटीनयुक्त सोयाबीन कबाब, नोट करा ही हेल्दी रेसिपी

Kababs Recipe: स्नॅक्समध्ये बनवा प्रोटीनयुक्त सोयाबीन कबाब, नोट करा ही हेल्दी रेसिपी

May 06, 2023, 04:52 PM IST

    • Healthy Snacks Recipe: संध्याकाळी थोडी भूक लागल्यावर काहीतरी हेल्दी खायची इच्छा असेल तर सोयाबीन कबाब बनवा. ते चवीला चांगले असतात आणि आरोग्यासाठीही चांगले असतात.
सोयाबीन कबाब

Healthy Snacks Recipe: संध्याकाळी थोडी भूक लागल्यावर काहीतरी हेल्दी खायची इच्छा असेल तर सोयाबीन कबाब बनवा. ते चवीला चांगले असतात आणि आरोग्यासाठीही चांगले असतात.

    • Healthy Snacks Recipe: संध्याकाळी थोडी भूक लागल्यावर काहीतरी हेल्दी खायची इच्छा असेल तर सोयाबीन कबाब बनवा. ते चवीला चांगले असतात आणि आरोग्यासाठीही चांगले असतात.

Soyabean Kabab Recipe: अनेक लोक संध्याकाळी चहासोबत नमकीन फरसाण किंवा वेफर्स खातात. तुम्ही सुद्धा असे काही खात असाल तर ते खाणे बंद करा. कारण ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्याऐवजी संध्याकाळी भूक लागल्यास तुम्ही स्नॅक्समध्ये गरमा गरम कबाब कबाब खाऊ शकता. तुम्ही सोयाबीनचे कबाब बनवू शकता. ते टेस्टला अप्रतिम लागतात. सोयाबीनमध्ये भरपूर प्रथिने असतात. त्यामुळे ते खाल्ल्याने तुमच्या आरोग्यालाही फायदा होतो. ते कसे बनवायचे ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Mother's Day Recipe: आईसाठी बनवा टेस्टी ड्राय केक, अंड्याशिवायही बनेल सॉफ्ट आणि स्पॉन्जी

Cancer Study: तुमच्या कारमध्ये असू शकतात कर्करोग निर्माण करणारे घटक, अभ्यासात आले समोर

Dal Tadka Recipe: चव आणि भूक दोन्ही वाढवते ढाबा स्टाईल दाल तडका, नोट करा पंजाबी रेसिपी

Glowing Skin: चेहऱ्यावर चमक हवी असेल तर नक्की फॉलो करा या गोष्टी, तरच दिसेल ग्लो

Jeera Biscuit: घरच्या घरी बनवा शुगर फ्री जीरा बिस्किट, चहा-कॉफीची वाढेल मजा

सोयाबीन कबाब बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- सोयाबीन

- बेसन

- कांदा

- आले

- लसूण

- हिरवी मिरची

- कोथिंबीर

- जिरे पावडर

- गरम मसाला

- आमचूर पावडर

- चाट मसाला

- मीठ

Chutney Recipe: सफरचंदाचे साल फेकू नका, त्यापासून बनवा आंबट गोड चटणी, नोट करा या २ रेसिपी

सोयाबीन कबाब बनण्याची पद्धत

हे बनवण्यासाठी प्रथम सोयाबीन भिजवा. जेव्हा ते फुगतील तेव्हा ते उकळवा. नंतर सर्व पाणी गाळून घ्या. आता ते चांगले पिळून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात सोयाबीन, कांदा, आले, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण या सर्व गोष्टी टाका आणि चांगले ब्लेंड करा. सर्व नीट बारीक झाल्यावर हे एका भांड्यात काढून त्यात सर्व मसाले व बेसन टाका. हे सर्व मिक्स करुन त्याचे पीठ मळून घ्या. आता त्याचे छोटे गोळे करून कबाबचा आकार द्या. असेच सर्व कबाब तयार करून घ्या. आता तव्यावर थोडे तेल टाकून त्यावर कबाब ठेवा. 

Tandoori Pulao: मुलं भाज्या खायला कंटाळा करत असतील तर बनवा तंदूरी पुलाव, रेस्टॉरंट सारखी टेस्ट देईल ही रेसिपी

दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. तुमचे सोयाबीनचे कबाब तयार आहे. कोथिंबरीची हिरवी चटणी, चहासोबत गरमा गरम सर्व्ह करा.

विभाग