Sweet and Sour Apple Peel Chutney Recipe: भाजी असो वा फळ, अनेकदा आपण त्याची साल निरुपयोगी समजून फेकून देतो. पण या सालींमध्ये सुद्धा भरपूर पोषण दडलेले असते. सफरचंदाची साल सोलून खाणे अनेकांना आवडते. पण सफरचंदाच्या सालीमध्ये अनेक पोषक घटक असतात. जर तुम्हाला या सालींमधले आवश्यक घटक वाया जाऊ द्यायचे नसतील, तर या सालींपासून चविष्ट चटणी तयार करा. सफरचंदाच्या सालीच्या आंबट आणि गोड दोन्ही चटण्या स्वादिष्ट लागतात. ही चटणी पूर्णपणे आरोग्यदायी आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी परिपूर्ण आहे. चला तर मग जाणून घेऊया सफरचंदाच्या सालीची गोड आणि आंबट चटणी कशी बनवायची.
- १ वाटी सफरचंदाची साल
- लसूणच्या ३ ते ४ पाकळ्या
- २ हिरव्या मिरच्या
- १ टोमॅटो बारीक चिरून
- लिंबाचा रस १ चमचा
- तेल
- १ इंच लांब आल्याचा तुकडा
- चवीनुसार मीठ
सफरचंदाच्या सालीची चटणी बनवण्यासाठी प्रथम साल पाण्याने नीट धुवा. नंतर त्यातील पाणी निथळण्यासाठी चाळणीत ठेवा. जेणेकरून सालातील सर्व पाणी नीट फिल्टर होईल. आता आल्याचे तुकडे बारीक चिरून घ्या. तसेच टोमॅटो आणि हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्या. आता सफरचंदाच्या सालीसह टोमॅटो, हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घ्या. चवीनुसार मीठ घालून बारीक करा. लक्षात ठेवा की चटणी थोडी जाडसर ठेवायची आहे. आता या चटणीत तेल आणि लिंबाचा रस घाला आणि चांगले बारीक करा. कढईत तेल टाकून मोहरी तडतडून घ्या. सोबत सुक्या लाल मिरच्या घाला. तयार झालेला तडका चटणीवर टाका आणि चविष्ट चटणी तयार आहे. चव वाढवण्यासाठी तुम्ही लंच आणि डिनर तसेच स्नॅक्ससाठी वापरू शकता.
सफरचंदाच्या सालीपासून आंबट चटणी सोबतच गोड चटणी सुद्धा बनवता येते. ही खूप टेस्टी लागते. चटणीबनवण्यासाठी सफरचंदाचे साल नीट धुवून चिरून घ्यावी. आता कढईत सफरचंदाचे साल टाका आणि त्यासोबत एक चतुर्थांश चमचे दालचिनी पावडर घाला. तसेच चिमूटभर मीठ, काळी मिरी आणि पुदिन्याची पाने घाला. साखर घालून मंद आचेवर शिजवा. सफरचंदाचे साल साखर घालून पूर्ण शिजून घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. सफरचंदाच्या सालीची टेस्टी गोड चटणी तयार आहे.