Restaurant Style Vegetable Tandoori Pulao Recipe: जर तुमची मुले ताटातली भाजी बघून नाक मुरडत असतील तर एखाद्या स्मार्ट मॉम प्रमाणे त्यांच्या आहारात भाज्यांचा समावेश करण्यासाठी त्यांना चविष्ट व्हेज तंदूरी पुलाव बनवून खायला द्या. खायला टेस्टी असण्यासोबतच ही रेसिपीही झटपट तयार होते. इतकंच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना त्याची चव खूप आवडते. तुम्ही ही रेसिपी लंच किंवा डिनरसाठी कधीही सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घेऊया रेस्टॉरंट स्टाईलमध्ये व्हेज तंदूरी पुलाव कसा बनवायचा.
- १ कप तांदूळ
- १ बटाटा
- १ कांदा
- २ गाजर
- २ कप सोया चंक्स
- १ शिमला मिरची
- २ कप दही
- १/२ टीस्पून लाल तिखट
- १/२ टीस्पून धने पावडर
- १ टीस्पून गरम मसाला
- १ टीस्पून चाट मसाला
- १ टीस्पून मीठ आणि मिरपूड
व्हेज तंदूरी पुलाव बनवण्यासाठी आधी तांदूळ धुवून थोडा वेळ भिजवून ठेवा. यानंतर गाजर, बटाटे, कांदे, सोया चंक्स आणि सिमला मिरची कापून वेगळे ठेवा. आता एक बाऊल घेऊन त्यात दही, तिखट, मीठ, मिरपूड, गरम मसाला, धनेपूड आणि चाट मसाला घालून सर्व नीट मिक्स करा आणि ते चिरलेल्या भाज्यांवर ओता. यानंतर भात शिजवा. तांदूळ शिजल्यानंतर मॅरीनेट केलेल्या भाज्या बटर आणि तेलात शिजवा. भाजी शिजली असे वाटल्यावर भातामध्ये टाकून थोडे जास्त शिजवा. तुमचे टेस्टी व्हेज तंदूरी पुलाव तयार आहे. तुम्ही तांदळाच्या फ्लेक्स आणि दही चटणीसोबत सर्व्ह करू शकता.