मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  इव्हनिंग स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे टेस्टी बटाट्याचे चाट

इव्हनिंग स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे टेस्टी बटाट्याचे चाट

Sep 15, 2022, 01:59 PM IST

    • इव्हनिंग स्नॅक्स मध्ये काहीतरी चटपटीत बनवण्याचा विचार करत असाल तर एकदा बटाट्याचे हे चाट ट्राय करा.
बटाट्याचे चाट

इव्हनिंग स्नॅक्स मध्ये काहीतरी चटपटीत बनवण्याचा विचार करत असाल तर एकदा बटाट्याचे हे चाट ट्राय करा.

    • इव्हनिंग स्नॅक्स मध्ये काहीतरी चटपटीत बनवण्याचा विचार करत असाल तर एकदा बटाट्याचे हे चाट ट्राय करा.

How To Make Potato Chaat : चाट म्हटले की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. भारतात अनेक प्रकारच्या चाट तयार केल्या जातात पण बटाटा किंवा आलू चाटची लोकप्रियता वेगळ्या पातळीवर आहे. लोकांना बटाटा चाट खायला आवडते. यासोबतच अनेक प्रयोगही केले जातात. जसे उकडलेले बटाटा चाट, ग्रीन बटाटा चाट, बटाटा-टोमॅटो चाट इ. जरी तुम्हाला बाजारात चांगली टेस्टी चाट मिळतील, पण त्यात भरपूर मसाले असतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. आम्ही तुम्हाला घरी भाजलेला बटाटा चाट कसा बनवायचा ते सांगत आहोत. तुम्ही इव्हनिंग स्नॅक्स म्हणून सर्व्ह करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Mother's Day 2024: यावर्षी कधी आहे मदर्स डे? जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस

Veg Roll: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा ब्रेडपासून बनलेले व्हेज रोल, सर्वांना आवडेल ही रेसिपी

International No Diet Day 2024: कुटूंब आणि मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेण्याचे आहेत हे फायदे!

Eye Care Tips: उष्णतेमुळे डोळ्यात जळजळ होते का? आराम मिळवण्यासाठी फॉलो करा हे उपाय

बटाटा चाट बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- ५ ते ७ मध्यम आकाराचे बटाटे

- १ मोठी वाटी मीठ

- १/२ टीस्पून किसलेले आले

- अर्धा कप कांदा

- १ टीस्पून हिरवी चटणी

- १ टेबलस्पून गोड चटणी

- १/२ टीस्पून काळी मिरी

- १ टीस्पून चाट मसाला

- १ वाटी बारीक शेव

- ३-४ हिरव्या मिरच्या

- १ मूठभर कोथिंबीर

 

कसे बनवावे

भाजलेला बटाटा चाट बनवण्यासाठी प्रथम कढईत मीठ गरम करा. दरम्यान, बटाटे चांगले धुवा आणि नंतर सूती कापडाने पुसून टाका. मीठ गरम झाल्यावर त्यात स्वच्छ केलेले बटाटे टाका आणि काही वेळ चांगले परतून घ्या. १२ ते १८ मिनिटांत बटाटे भाजले जातील. बटाटे तपासा आणि नंतर पॅनमधून बाहेर काढा. आता त्याचे तुकडे करा आणि नंतर त्यात मसाले घाला. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, किसलेले आले घालून मिक्स करा. शेवटी गोड आणि हिरव्या मिरचीची चटणी घालून मिक्स करा. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून बारीक शेव आणि कोथिंबीरने गार्निश करून सर्व्ह करा.