मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  नवरात्री उपवासासाठी झटपट बनवा चटपटीत भेळ, बराच काळ लागणार नाही भूक

नवरात्री उपवासासाठी झटपट बनवा चटपटीत भेळ, बराच काळ लागणार नाही भूक

Mar 27, 2023, 08:00 PM IST

  • Chaitra Navratri: जर तुम्हाला नऊ दिवसांच्या उपवासात काही वेगळं खायची इच्छा असेल तर फराळी भेळ बनवा.

उपवासासाठी फराळी भेळ

Chaitra Navratri: जर तुम्हाला नऊ दिवसांच्या उपवासात काही वेगळं खायची इच्छा असेल तर फराळी भेळ बनवा.

  • Chaitra Navratri: जर तुम्हाला नऊ दिवसांच्या उपवासात काही वेगळं खायची इच्छा असेल तर फराळी भेळ बनवा.

Falahari Bhel Recipe: नवरात्री दरम्यान बरेच लोक देवीला प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण ९ दिवस उपवास करतात. उपवासाच्या वेळी मातेचे उपासक भूक शांत ठेवण्यासाठी आणि शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या फराळाच्या पदार्थांचा आहारात समावेश करतात. अशा वेळी सारखे तेच ते पदार्थ खाण्याचा कंटाळा येत असेल, तर चटपट फराळी भेळ रेसिपी ट्राय करा.

ट्रेंडिंग न्यूज

Life Mantra: तुम्हाला जीवनात आनंद हवा आहे का? लगेच या सवयी पूर्णपणे सोडा, फरक दिसेल

Travel Tips: फार कमी लोक एक्सप्लोर करतात मनालीची ही ठिकाणं, सुट्ट्यांमध्ये द्या भेट

Egg Masala: वीकेंडला बनवा टेस्टी तवा मसाला एग, नोट करा झटपट तयार होणारी ही रेसिपी

Mint Leaves: उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर उपाय आहेत पुदिन्याची पानं, जाणून घ्या घरी कसे वाढवावे

फराळी भेळ बनवण्यासाठी साहित्य

- अर्धी वाटी साबुदाणा

- उकडलेला बटाटा

- लाल तिखट

- शेंगदाणे

- काजू

- चिरलेली कोथिंबीर

- तूप

- सैंधव मीठ

- लिंबाचा रस

फराळी भेळ बनवण्याची पद्धत

फलाहारी भेळ बनवण्यासाठी प्रथम साबुदाणा पाण्याने धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवावा. यानंतर उकडलेले बटाटे कापल्यानंतर, शेंगदाणे आणि काजू हलके लाल होईपर्यंत भाजून घ्या. आता कढईत तूप गरम करून त्यात साबुदाणा शिजवून मऊ होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर ते एका भांड्यात काढून त्यात उकडलेले बटाटे, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर, लिंबाचा रस, शेंगदाणे, सैंधव मीठ आणि लाल तिखट घालून चांगले मिक्स करा. तुमची चविष्ट आणि चटपटीत फलाहारी भेळ तयार आहे.

विभाग