Chaitra Navratri: उपवासात वारंवार भूक लागते? खा या दोन हेल्दी गोष्टी, मिळेल एनर्जी
Vrat Recipe: चैत्र नवरात्रीत काही लोक संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात. अशा परिस्थितीत काही लोकांना वारंवार भूक लागते. अशा वेळी तुम्ही हे हेल्दी स्नॅक्स खाऊ शकता.
Healthy Snacks Options for Fasting: आज चैत्र नवरात्रीचा तिसरा दिवस. यानिमित्ताने काही लोक पूर्ण नऊ दिवस उपवास करतात, तर काहीजण पहिल्या दिवशी आणि अष्टमीला उपवास करतात. अनेकदा काहींना उपवास करताना पुन्हा पुन्हा भूक लागते. तुमच्या खाण्याच्या सवयी अचानक बदलल्यामुळे असे घडते. नवरात्रीच्या उपवासात तुम्हाला वारंवार भूक लागत असेल, तर तुम्ही काही आरोग्यदायी पर्याय खाऊ शकता. स्नॅक्समध्ये खाण्याचे पर्याय येथे पहा
ट्रेंडिंग न्यूज
मखाना चाट
उपवास करताना पुन्हा पुन्हा भूक लागत असेल तर भाजलेल्या मखानाचा आहारात समावेश करू शकता. हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. ते बनवण्यासाठी कढईत तूप गरम करून त्यात मखाना घालून भाजून घ्या. आता मखाना एका प्लेटमध्ये काढून त्यावर दही, चिंचेची चटणी आणि तिखट चटणी टाका. सैंधव मीठ आणि भाजलेले जिरे घालून खा.
साबुदाणा नमकीन
साबुदाणा नमकीन घरीही बनवून खाऊ शकतो. बनवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कढईत तूप गरम करून त्यात साबुदाणा घालून त्यांना फुलवून घ्या. तुम्ही यात थोडे भाजलेले शेंगदाणे सुद्धा टाकू शकता. यावर मीठ घालून खा. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडीशी लाल तिखट पावडर स्प्रेड करु शकता. हे चहासोबतही खायला छान लागते.