मराठी बातम्या  /  Lifestyle  /  How To Make Banana Dry Fruit Shake For Chaitra Navratri Vrat

Banana Drink: नवरात्रीच्या उपवासात सकाळीच प्या केळीचे हे ड्रिंक, दीर्घ काळपर्यंत लागणार नाही भूक

बनाना शेक
बनाना शेक (pexels)
Hiral Shriram Gawande • HT Marathi
Mar 27, 2023 10:45 AM IST

Chaitra Navratri Vrat: नवरात्रीच्या उपवासात दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही केळीचे हे ड्रिंक बनवून पिऊ शकता. हे प्यायल्याने किमान अर्धा दिवस तुम्हाला भूक लागणार नाही.

Banana Dry Fruit Drink Recipe: नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी आज सहावा दिवस आहे. उपवासात दिवसभर एनर्जी टिकून रहावी, लवकर भूक लागू नये म्हणजे फराळाचे विविध पदार्थ केले जातात. केळी हे असे फळ आहे की उपवासाच्या वेळी ते खाल्ल्याने तुम्ही दीर्घकाळ राहू शकता. हे खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही. जर तुम्हाला उपवासात दिवसाची सुरुवात केळीने करायची असेल तर तुम्ही केळी आणि ड्रायफ्रुट्सपासून बनवलेले हे ड्रिंक पिऊ शकता. हे प्यायल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि दीर्घकाळ भूक लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया झटपट केळीचे ड्रिंक कसे तयार करता येईल.

ट्रेंडिंग न्यूज

केळीचे ड्रिंक बनवण्यासाठी साहित्य:

- ३-४ खजूर (बिया काढून)

- ५ काजू

- ५ पिस्ते

- २-३ पिकलेली केळी

- वेलची पावडर

- १ चमचा साखर

- १ ग्लास थंड दूध

केळीचे ड्रिंक बनवण्याची पद्धत

प्रथम अर्धा कप दूध घेऊन त्यात बिया काढलेले खजूर, काजू, पिस्ते आणि बदाम मिक्सरच्या जारमध्ये टाका आणि याची चांगली पेस्ट बनवा. लक्षात ठेवा की सर्व ड्रायफ्रूट्स चांगले बारीक केले गेले आहेत आणि पेस्ट तयार आहे. आता उरलेले दूध मिक्सरच्या भांड्यात ओता आणि त्यात केळी घालून ब्लेंड करा. आता या ड्रायफ्रुट्सची पेस्ट केळी आणि दुधाच्या मिश्रणात घाला. सोबत थोडी साखर टाका, म्हणजे गोडपणा संतुलित राहील. साखर घालताना लक्षात ठेवा की खजूर आणि केळीमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. फक्त एक किंवा दोन चमचे साखर टाकू शकता. आता हे सर्व नीट ब्लेंड करुन घ्या आणि थंडगार सर्व्ह करा. हे ड्रिंक उपवास दरम्यान दिवसभर उर्जेसाठी एकदम परफेक्ट आहे.

WhatsApp channel