मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Facial Tips: ग्लोइंग स्किनसाठी महागडी क्रीम नाही तर ट्राय करा मुलतानी मातीचा हा देशी फेशियल

Facial Tips: ग्लोइंग स्किनसाठी महागडी क्रीम नाही तर ट्राय करा मुलतानी मातीचा हा देशी फेशियल

Mar 16, 2023, 05:04 PM IST

    • Skin Care Tips: आजींच्या काळापासून चालत आलेली मुलतानी माती केवळ केसांसाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठीही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी मुलतानी मातीचे फेशियल कसे करायचे ते पाहा.
मुलतानी मातीचा फेशियल (HT)

Skin Care Tips: आजींच्या काळापासून चालत आलेली मुलतानी माती केवळ केसांसाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठीही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी मुलतानी मातीचे फेशियल कसे करायचे ते पाहा.

    • Skin Care Tips: आजींच्या काळापासून चालत आलेली मुलतानी माती केवळ केसांसाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठीही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी मुलतानी मातीचे फेशियल कसे करायचे ते पाहा.

Multani Mitti Desi Facial: चेहऱ्यावर पार्लरसारखी चमक आणण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही. महागड्या क्रीम, ट्रीटमेंटच्या खर्चाचे टेन्शन सोडून मुलतानी मातीच्या या देशी फेशियल टिप्स ट्राय करा. आजीच्या काळापासून चालत आलेली मुलतानी माती केवळ केसांसाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठीही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. मुलतानी मातीचे फेशियल त्वचेचा टोन आणि रंग सुधारून तिला मऊ ठेवण्यास मदत करू शकते. इतकंच नाही तर या फेशियलच्या मदतीने त्वचेत साठलेले अतिरिक्त तेल आणि अशुद्धी देखील दूर होते. मुलतानी मातीच्या या फेशियलमुळे त्वचेचा रंग सुधारण्यास आणि चेहऱ्यावरील काळेपणा, पिग्मेंटेशन, टॅनिंग, डाग आणि मुरुमांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया चेहरा बेदाग आणि चमकदार ठेवण्यासाठी घरच्या घरी मुलतानी मातीपासून फेशियल कसे बनवायचे.

ट्रेंडिंग न्यूज

Mango Storage Tips: पिकलेले आंबे होणार नाही लवकर खराब, फक्त साठवताना लक्षात ठेवा या गोष्टी

Jaljeera Recipe: उन्हाळ्यात शरीराला कूल ठेवेल थंडगार जलजीरा, बनवण्यासाठी नोट करा रेसिपी

Health Care Tips: ही फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास आरोग्याला पोहोचते हानी, जाणून घ्या याचे कारण

Raita Recipe: उन्हाळ्यात या ५ गोष्टींपासून बनवा टेस्टी रायता, पाहा जेवणाची चव वाढवणारी रेसिपी

मुलतानी मातीने फेशियल कसे करावे

मुलतानी मातीचे फेशियल करण्यासाठी सर्वप्रथम एक चमचा मुलतानी मातीत एक चमचा दही मिक्स करुन चेहऱ्यावर मसाज करून १५-२० मिनिटे चेहऱ्यावर ठेवावे. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. यानंतर मुलतानी मातीत अर्धा चमचा हळद पावडर आणि १-२ चमचे गुलाबजल किंवा कच्चे दूध मिक्स करा. हे चेहरा, मान आणि कानावर चांगले लावून साधारण २० मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

यानंतर मुलतानी मातीचा स्क्रब म्हणून वापर करण्यासाठी मुलतानी मातीत कॉफी पावडर किंवा ओट्स पावडर मिक्स करुन त्यात लिंबाचा रस किंवा गुलाबजल घालून चांगले मिक्स करुन घ्यावे. हे थोडेसे चेहऱ्यावर लावून सर्कुलर मोशनमध्ये मसाज करून चेहरा एक्सफोलिएट करावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. यानंतर मुलतानी मातीपासून फेसपॅक बनवण्यासाठी १ चमचा मुलतानी मातीत कच्चे दूध आणि चंदन पावडर मिक्स करुन फेसपॅक तयार करा. हे चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटांनी धुवून टाका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग