मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Breakfast Recipe: रविवारची करा हेल्दी सुरूवात, नाश्त्यात बनवा पालक उत्तपम

Breakfast Recipe: रविवारची करा हेल्दी सुरूवात, नाश्त्यात बनवा पालक उत्तपम

Mar 19, 2023, 09:55 AM IST

    • Healthy Breakfast Recipe: मुले पालकाची भाजी खाण्याचा कंटाळा करतात. पण पालक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत मुलांना नाश्त्यात पालकाचे उत्तपम बवून द्या. हा हेल्दी नाश्ता मुलांना आवडेल.
पालक उत्तपम

Healthy Breakfast Recipe: मुले पालकाची भाजी खाण्याचा कंटाळा करतात. पण पालक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत मुलांना नाश्त्यात पालकाचे उत्तपम बवून द्या. हा हेल्दी नाश्ता मुलांना आवडेल.

    • Healthy Breakfast Recipe: मुले पालकाची भाजी खाण्याचा कंटाळा करतात. पण पालक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत मुलांना नाश्त्यात पालकाचे उत्तपम बवून द्या. हा हेल्दी नाश्ता मुलांना आवडेल.

Palak or Spinach Uttapam Recipe: बहुतेक मुले हेल्दी भाज्या खाण्यास कंटाळा करतात. विशेषतः जेव्हा पालक खाण्याची वेळ येते. पालकाची भाजी म्हटली की मुलं त्यापासून दूर पळतात. पण ही हेल्दी भाजी फायदेशीर आहे. मुलांसह कुटुंबातील सर्व सदस्यांना पालक खायला द्यायचा असेल तर नाश्त्यात पालक उत्तपम बनवा. पालकाचे सर्व गुणधर्मही मिळतील आणि चवीला टेस्टीही लागेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते बनवण्यासाठी जास्त वेळ आणि मेहनत लागत नाही आणि काही मिनिटांत तयार होते. चला तर मग जाणून घेऊया पालक उत्तपम बनवण्याची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

Travel in May: मे महिन्यात फिरण्यासाठी बेस्ट आहेत ही ठिकाणं, तुमची सुट्टी होईल संस्मरणीय

Mother's Day Recipe: आईसाठी बनवा टेस्टी ड्राय केक, अंड्याशिवायही बनेल सॉफ्ट आणि स्पॉन्जी

Cancer Study: तुमच्या कारमध्ये असू शकतात कर्करोग निर्माण करणारे घटक, अभ्यासात आले समोर

Dal Tadka Recipe: चव आणि भूक दोन्ही वाढवते ढाबा स्टाईल दाल तडका, नोट करा पंजाबी रेसिपी

पालक उत्तपम बनवण्यासाठी साहित्य

- एक वाटी रवा,

- अर्धी वाटी दही,

- पालक १०० ग्रॅम

- एक टीस्पून मोहरी

- अर्धा चमचा जिरे

- दोन हिरव्या मिरच्या

- मीठ चवीनुसार

पालक उत्तपम बनवण्याची पद्धत

हेल्दी पालक उत्तपम बनवण्यासाठी प्रथम पालक पाण्यात उकळून घ्या. नंतर हा पालक बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. एका मोठ्या भांड्यात रवा घ्या आणि त्यात दही घाला. चांगले मिक्स करा आणि सुमारे अर्धा तास बाजूला ठेवा. नंतर त्यात पालक प्युरी घाला आणि आवश्यक असल्यास पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

उत्तपम पेस्ट मध्ये फोडणी घाला

उत्तपमची चव वाढवण्यासाठी त्यात फोडणी घाला. तडक्यासाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. तसेच मोहरी आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. कढीपत्ता घाला आणि उत्तपम पेस्टमध्ये तडका घाला. आता ही पेस्ट उत्तपम बनवण्यासाठी तयार आहे. ते बनवण्यासाठी पॅन गरम करा आणि तेल घाला. तव्यावर तयार केलेले बॅटर घाला आणि त्यावर झाकन ठेवा. सुमारे दोन मिनिटे शिजवा. ते चांगले शिजल्यावर उलटे करून एक मिनिट शिजवा. दोन्ही बाजूने नीट भाजल्यानंतर ते तव्यावरून काढून प्लेटमध्ये ठेवा आणि हिरवी चटणी किंवा नारळाच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

विभाग