मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pickle Recipe: टेस्टी बनारसी लाल मिरचीचे लोणचे वाढवेल जेवणाची लज्जत, सोपी आहे रेसिपी

Pickle Recipe: टेस्टी बनारसी लाल मिरचीचे लोणचे वाढवेल जेवणाची लज्जत, सोपी आहे रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 16, 2023 02:03 PM IST

Summer Special Recipe: उन्हाळ्यात जेवणासोबत लोणचे किंवा चटणी असेल तर जेवणाची चव दुप्पट होते. नेहमीचे कैरी, लिंबाचे लोणचे नाही तर बनवा बनारसी लाल मिरचीचे लोणचे. पाहा ही सोपी रेसिपी.

बनारसी लाल मिरचीचे लोणचे
बनारसी लाल मिरचीचे लोणचे

Banarasi Red Chilli Pickle Recipe: जेवणासोबत वाढलेले लोणचे जेवणाची चव तर वाढवतेच पण खाणाऱ्याची भूकही दुप्पट करते. उन्हाळ्यात लोक अनेकदा तक्रार करतात की त्यांची भूक कमी होते. अशा परिस्थितीत जेवणाच्या ताटात सर्व्ह केलेले लोणचे चव वाढवतेच शिवाय भूकेचीही काळजी घेते. पण कैरी, लिंबू, गाजर अशा लोणच्याच्या चवीने तुम्हाला कंटाळा आला असेल तर बनारसी लाल मिरचीचे लोणचे करून पहा. बनारसी स्टाईलने बनवलेले हे लाल मिरचीचे लोणचे मसालेदार आणि तिखट आहे, जे तुम्ही तुमच्या जेवणासोबत साइड डिश म्हणून देऊ शकता.

बनारसी लाल मिरचीच्या लोणच्यासाठी आवश्यक साहित्य

- १५- २० लाल मोठ्या मिरच्या

- २ चमचे मोहरी

- ३ चमचे बडीशेप

- २ चमचे मेथी दाणे

- २ चमचे जिरे

- ७-८ काळी मिर

- २ चमचे लिंबाचा रस

- १/४ टीस्पून हिंग

- १/२ टीस्पून हळद

- ३ चमचे आमचूर

- चवीनुसार मीठ

- मोहरी तेल

बनारसी लाल मिरचीचे लोणचे बनवण्याची सोपी पद्धत

बनारसी लाल मिरचीचे लोणचे बनवण्यासाठी प्रथम लाल मिरची धुवून वाळवा आणि त्यांचे सर्व देठ आणि बिया काढून टाका. यानंतर चाकूने मिरचीच्या मध्यभागी एक चीरा तयार करून वेगळे ठेवा. आता सर्व मसाले कोरडे भाजून, थंड करून बारीक वाटून घ्या. आता त्यात मीठ, भाजलेला मसाला पावडर, लिंबाचा रस आणि सुमारे ४ चमचे गरम आणि थंड मोहरीचे तेल घालून सर्व चांगले मिक्स करा. आता या तयार लोणच्याचा मसाला मिरच्यांमध्ये भरून काचेच्या बरणीत ठेवा. यानंतर उरलेले मोहरीचे तेल मिरचीमध्ये टाका. मिरचीचे लोणचे पूर्णपणे तयार होण्यासाठी ५-६ दिवस उन्हात ठेवावे.

विभाग