मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Travel Tips: बेंगळुरूजवळ आहेत सुंदर हिल स्टेशन, हिमाचलसारख्या फीलसाठी मित्रांसोबत करा एक्सप्लोर

Travel Tips: बेंगळुरूजवळ आहेत सुंदर हिल स्टेशन, हिमाचलसारख्या फीलसाठी मित्रांसोबत करा एक्सप्लोर

Mar 16, 2023, 10:09 PM IST

    • Travel with Friends: उन्हाळ्यात हिल स्टेशनला फिरायला जायला सगळ्यांना आवडते. येथे आम्ही बेंगळुरू जवळील काही अतिशय सुंदर हिल स्टेशन्स सांगत आहोत, जिथे तुम्ही मित्रांसोबत जाऊ शकता.
हिल स्टेशन (unsplash)

Travel with Friends: उन्हाळ्यात हिल स्टेशनला फिरायला जायला सगळ्यांना आवडते. येथे आम्ही बेंगळुरू जवळील काही अतिशय सुंदर हिल स्टेशन्स सांगत आहोत, जिथे तुम्ही मित्रांसोबत जाऊ शकता.

    • Travel with Friends: उन्हाळ्यात हिल स्टेशनला फिरायला जायला सगळ्यांना आवडते. येथे आम्ही बेंगळुरू जवळील काही अतिशय सुंदर हिल स्टेशन्स सांगत आहोत, जिथे तुम्ही मित्रांसोबत जाऊ शकता.

Beautiful Hill Stations Near Bengaluru: जर तुम्ही उन्हाळ्यात हिल स्टेशनला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बेंगळुरूजवळच्या हिल स्टेशनवर जाऊ शकता. थंड वारा आणि उंच डोंगरावर मित्रांसोबत फिरता येईल. या टेकड्यांमध्ये अशी काही ठिकाणे आहेत जिथे तुम्ही सुंदर चहा-कॉफीच्या बागांना भेट देऊ शकता. बेंगळुरूची प्रसिद्ध हिल स्टेशन्स जाणून घ्या-

ट्रेंडिंग न्यूज

World Asthma Day 2024: वायू प्रदूषणामुळे वाढतोय दम्याचा त्रास, जाणून घ्या कसे करावे व्यवस्थापन

Parenting Tips: शिक्षण सुधारणांमध्ये सूक्ष्म-शालेय शिक्षणाची भूमिका काय आहे? जाणून घ्या

Summer Essentials: उन्हाळ्यात दिसायचे आहे कूल आणि स्टायलिश? तुमच्याजवळ नक्की ठेवा या ५ प्रकारचे ड्रेस

Mother's Day 2024: यावर्षी कधी आहे मदर्स डे? जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस

१. नंदी हिल्स

नंदी हिल्स हा कर्नाटकातील एक डोंगरी किल्ला आहे, जो अतिशय सुंदर आहे. जर तुम्हाला मित्रांसोबत सुंदर टेकड्यांचा आनंद घ्यायचा असेल तर इथे नक्की जा. नंदी हिल्स जगातील सर्वात उंच पर्वतांपैकी एक आहे.

२. कुर्ग

जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. सुंदर पर्वतांनी वेढलेले, कूर्ग चहा-कॉफीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. हिरवेगार डोंगर आणि त्यातून येणारा सुगंध अप्रतिम आहे.

३. चिकमंगळूर

चिकमंगळूर हे कर्नाटकातील मुल्लायनगिरी पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे हिल स्टेशन खूप प्रसिद्ध आहे आणि हे ठिकाण 'कॉफी लँड ऑफ कर्नाटक' म्हणून ओळखले जाते. हे हिरवीगार जंगले आणि उंच पर्वतांसाठी प्रसिद्ध आहे.

४. सावनदुर्गा

बेंगळुरूपासून ६० किलोमीटर अंतरावर सावनदुर्गा नावाची टेकडी आहे. हे आशियातील सर्वात मोठ्या टेकड्यांपैकी एक मानले जाते. हे ठिकाण अत्यंत प्रसन्न वातावरण आणि सुंदर सूर्यास्त आणि सूर्योदयासाठी ओळखले जाते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग