मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cumin Seeds Side Effects: जिऱ्याच्या अतिसेवनाने उद्भवू शकतात अनेक समस्या! जाणून घ्या त्याचे तोटे

Cumin Seeds Side Effects: जिऱ्याच्या अतिसेवनाने उद्भवू शकतात अनेक समस्या! जाणून घ्या त्याचे तोटे

Jan 24, 2023, 10:46 AM IST

    • Health Care: जिऱ्याचा एका मर्यादेपर्यंत शरीराला फायदा होतो, पण शरीरात त्यांचे प्रमाण वाढले तर अनेक समस्या होऊ शकतात.
जिऱ्याच्या अतिसेवनाने परिणाम (Freepik )

Health Care: जिऱ्याचा एका मर्यादेपर्यंत शरीराला फायदा होतो, पण शरीरात त्यांचे प्रमाण वाढले तर अनेक समस्या होऊ शकतात.

    • Health Care: जिऱ्याचा एका मर्यादेपर्यंत शरीराला फायदा होतो, पण शरीरात त्यांचे प्रमाण वाढले तर अनेक समस्या होऊ शकतात.

प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात जिरे वापरले जाते. जिऱ्यामुळे जेवणाची चव खूप वाढते. भाजी, रायता आणि सॅलड्समध्येही ते घातले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का की जिऱ्याचा जास्त वापर केल्याने तुमच्या शरीराला खूप नुकसान होऊ शकते. होय, हे विचित्र वाटेल पण हे खरे आहे. जिऱ्याचे अतिसेवन तुम्हाला अनेक समस्यांनी घेरू शकते. वास्तविक, जिरेमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे ई, ए, सी आणि बी-कॉम्प्लेक्स, लोह, तांबे, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅंगनीज, जस्त आणि मॅग्नेशियम आढळतात. एका मर्यादेपर्यंत या सर्वांचा शरीराला फायदा होतो, पण शरीरात त्यांचे प्रमाण वाढले तर अनेक समस्या होऊ शकतात. यामुळे आजच्या बातम्यांमध्ये आम्ही तुम्हाला जिऱ्यामुळे होणाऱ्या समस्यांबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही सावध राहू शकाल.

ट्रेंडिंग न्यूज

Health Care Tips: पूर्ण दिवस एसीमध्ये राहता का? सावधान! यामुळे होऊ शकतात हे मोठे आजार

Potato Bhaji Recipe: दुपारच्या जेवणात काही वेगळं खायचं असेल तर ट्राय करा दही बटाट्याच्या भाजीची रेसिपी

Multani Mitti for Skin: उन्हाळ्यात चेहऱ्यावर अशा प्रकारे लावा मुलतानी माती, त्वचेला मिळेल थंडावा

joke of the day : प्रेमात सपशेल अपयशी ठरलेला प्रियकर जेव्हा प्रेयसीच्या लग्नाला जातो…

अ‍ॅलर्जी

अनेकदा अनेकांना जिऱ्याची अ‍ॅलर्जी असल्याचे दिसून येते. जिरे खाल्ल्यानंतर जर तुम्हाला थोडे विचित्र वाटत असेल तर काळजी घ्या. तुम्हाला अ‍ॅलर्जीची समस्या असू शकते.

गरोदरपणात जिरे खाऊ नये

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात गर्भधारणेचा काळ खूप सुंदर असतो. यावेळी, महिलांना जिरे खाण्यास मनाई आहे कारण जिरेचा प्रभाव खूप गरम असतो.

मधुमेह

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणीतरी मधुमेहाचे रुग्ण असाल तर जिऱ्याचे सेवन फार कमी प्रमाणात करा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

उल्टी

जिरे खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्यांचा त्रास होऊ लागतो. म्हणूनच जिरे कमी प्रमाणातच खावेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग