Hot Food in Fridge: गरम अन्न फ्रीजमध्ये का ठेवू नये? जाणून घ्या उत्तर!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hot Food in Fridge: गरम अन्न फ्रीजमध्ये का ठेवू नये? जाणून घ्या उत्तर!

Hot Food in Fridge: गरम अन्न फ्रीजमध्ये का ठेवू नये? जाणून घ्या उत्तर!

Jan 23, 2023 03:59 PM IST

Kitchen Tips: अनेकांकडून आपण ऐकलं आहे कि गरम पदार्थ, गरम अन्न लगेच फ्रिजमध्ये ठेवू नयेत. या मागचं नक्की काय कारण आहे ते जाणून घ्या.

किचन टिप्स
किचन टिप्स (Freepik )

Food Storage Tips: शिजवलेले अन्न जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी आपण ते रेफ्रिजरेटरमध्ये अर्थात फ्रिजमध्ये ठेवतो. परंतु फ्रिजमध्ये गोष्टी ठेवण्याचेही काही नियम आहेत. ते नियम फॉलो केले नाहीत तर अन्नपदार्थ खराब होऊ शकतात. आपण फ्रिजमध्ये सापडलेल्या मॅन्युअलमध्ये लिहिलेल्या एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. फ्रिजमध्ये गरम अन्न ठेवल्यास ते खराब होऊ शकते, असे मॅन्युअलमध्ये स्पष्टपणे लिहिले असते. जर तुम्ही अन्न शिजवल्याबरोबर फ्रिजमध्ये ठेवले तर ते तुमच्या फ्रिजचे नुकसान तर करतेच पण ते अन्न वापरण्यास अयोग्य बनते. यामागचं नक्की काय कारण आहे ते जाणून घेऊयात.

'ही' आहेत करणं

> फ्रिजमध्ये गरम वस्तू ठेवताच फ्रीजचे वातावरण तापू लागते. मग कंप्रेसरला तापमान राखण्यासाठी झगडावे लागते. यामुळे फ्रिजही खराब होऊ शकतो.

> थर्मोडायनामिक्सच्या दुसऱ्या नियमानुसार, उबदार हवा जास्त तापमानाच्या ठिकाणाहून कमी तापमानाच्या ठिकाणी जाते. फ्रीजमध्ये गरम अन्न किंवा दूध इत्यादी ठेवताच भांड्यांचे तापमान आणि फ्रीजचे तापमान यांच्यातील तफावतामुळे कंडेन्सेशनची प्रक्रिया होते, त्यामुळे भांड्यावर पाण्याचे थेंब गोठू लागतात. हे थेंब फ्रीजच्या आतही गोठू लागतात ज्यामुळे आर्द्रता वाढते. फ्रीजमधील ओलाव्यामुळे अन्न खराब होऊ शकते आणि अन्न विषबाधा देखील होऊ शकते.

आपण घाईत असल्यास काय करावे?

अन्न शिजल्यानंतर, खोलीच्या तापमानाला थंड होऊ द्या आणि मगच ते फ्रीजमध्ये ठेवा. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अन्न शिजवल्यानंतर दोन तासांच्या आत खा किंवा फ्रीजमध्ये ठेवा. जर वेळेची कमतरता असेल तर वेगवेगळ्या भांड्यांमध्ये गरम अन्न लहान भागांमध्ये ठेवा जेणेकरून ते लवकर थंड होईल आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवाता येईल. तसेच असे केल्याने, फ्रिजला तापमान राखण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, तसेच ओलावा वाढण्यास संधी मिळणार नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. )

Whats_app_banner