मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Brand Ambassador: धारावी झोपडपट्टीतील ही तरुणी बनली लक्झरी ब्युटी ब्रँडचा चेहरा

Brand Ambassador: धारावी झोपडपट्टीतील ही तरुणी बनली लक्झरी ब्युटी ब्रँडचा चेहरा

May 22, 2023, 02:48 PM IST

    • Dharavi Mumbai Girl: मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत राहणारी १४ वर्षीय मलिशा खारवा हिला लक्झरी ब्युटी ब्रँड फॉरेस्ट एसेंशियल्सच्या 'द युवती कलेक्शन' या नवीन कँपेनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
धारावी झोपडपट्टीतील मलिशा बनवी ब्युटी कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर

Dharavi Mumbai Girl: मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत राहणारी १४ वर्षीय मलिशा खारवा हिला लक्झरी ब्युटी ब्रँड फॉरेस्ट एसेंशियल्सच्या 'द युवती कलेक्शन' या नवीन कँपेनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

    • Dharavi Mumbai Girl: मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत राहणारी १४ वर्षीय मलिशा खारवा हिला लक्झरी ब्युटी ब्रँड फॉरेस्ट एसेंशियल्सच्या 'द युवती कलेक्शन' या नवीन कँपेनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Girl from Dharavi Become Brand Ambassador for Beauty Brand: मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत राहणारी १४ वर्षीय मलिशा खारवा हिला लक्झरी ब्युटी ब्रँड फॉरेस्ट एसेंशियल्सच्या 'द युवती कलेक्शन' या नवीन कम्पेनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमन याने २०२० मध्ये एका गाण्याच्या शूटिंगसाठी मुंबईला पोहोचल्यावर मलिशाचा शोध लागला. त्याने नंतर या मुलीसाठी इंस्टाग्राम अकाउंट देखील उघडले. १४ वर्षीय मलिशा खारवाचे सध्या इंस्टाग्रामवर २ लाख २५ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Skin Care For Men: उन्हाळ्यात पुरुषांनाही गरजेचं आहे स्किन केअर, चेहरा चमकवण्यासाठी करा हे काम

World Laughter Day 2024: कामाच्या ठिकाणी हास्य कसे गेम चेंजर ठरू शकते? जागतिक हास्य दिन निमित्त जाणून घ्या

Heat Rash In Babies: वाढत्या गरमीमुळे लहान बाळांना घामोळ्या येतायत? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

Weight Loss: वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? मग, डाएटमध्ये आवर्जून सामील करा पपईच्या बिया! फायदे वाचाच...

मुंबईच्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मलिशाने अलीकडच्या काळात अनेक मॉडेलिंग गिग्स केले आहेत. तसेच तिने ‘लिव्ह युवर फेयरीटेल’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे. आता, तिची मोठी आणि लेटेस्ट कामगिरी म्हणजे तिला फॉरेस्ट एसेंशियल्सच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तरुणांना मानसिकदृष्ट्या सक्षम करणे हा त्यामागील संस्थेचा उद्देश आहे.

फॉरेस्ट एसेंशियल्सने अलीकडेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मलिशा त्यांच्या स्टोअरमध्ये प्रवेश करताना, अभियानसोबत फोटो घेताना दिसत आहे. क्लिप शेअर करताना, ब्रँडने लिहिले, "या मुलीचा चेहरा तिची स्वप्ने उलगडताना पाहून आनंदाने उजळला आहे." या व्हिडिओला चार लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यावर कमेंट करताना एका इंस्टाग्राम युजरने लिहिले की, "तिला यशस्वी होताना पाहून खूप आनंद झाला!!! तिला शुभेच्छा आणि भविष्यात आणखी यश मिळो." मुलींनी कधीही ब्युटी ब्रँडला मान्यता द्यावी असे वाटत नव्हते, आता काळ बदलला आहे... खूप सुंदर आहे."

 

फॉरेस्ट एसेन्शियल्सच्या संस्थापक आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मीरा कुलकर्णी म्हणतात, “आम्ही मलिषाच्या स्वप्नाला पाठिंबा देत आहोतच, पण तरुण मनांना सशक्त बनवण्याच्या प्रकल्पातही योगदान देत आहोत. वंचित मुलांच्या शिक्षणात हातभार लावण्यासाठी आणि त्यांना उज्ज्वल भविष्य देण्यासाठी हा ब्रँड १०% उत्पन्न प्रकल्पासाठी दान करेल.

विभाग