मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care For Men: उन्हाळ्यात पुरुषांनाही गरजेचं आहे स्किन केअर, चेहरा चमकवण्यासाठी करा हे काम

Skin Care For Men: उन्हाळ्यात पुरुषांनाही गरजेचं आहे स्किन केअर, चेहरा चमकवण्यासाठी करा हे काम

May 05, 2024, 11:40 AM IST

    • Summer Skin Care Tips: उन्हाळ्यात घामामुळे पुरुषांचा चेहरा निस्तेज दिसू लागतो. तसेच त्वचेवर पुरळ आणि घाण जमा होऊ लागते. अशा परिस्थितीत त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
Skin Care For Men: उन्हाळ्यात पुरुषांनाही गरजेचं आहे स्किन केअर, चेहरा चमकवण्यासाठी करा हे काम (unsplash)

Summer Skin Care Tips: उन्हाळ्यात घामामुळे पुरुषांचा चेहरा निस्तेज दिसू लागतो. तसेच त्वचेवर पुरळ आणि घाण जमा होऊ लागते. अशा परिस्थितीत त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

    • Summer Skin Care Tips: उन्हाळ्यात घामामुळे पुरुषांचा चेहरा निस्तेज दिसू लागतो. तसेच त्वचेवर पुरळ आणि घाण जमा होऊ लागते. अशा परिस्थितीत त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

Skin Care Routine for Men: उन्हाळ्यात घाम येणे सामान्य आहे. परंतु पुरुषांच्या चेहऱ्यावर जास्त घाम येतो. अशा परिस्थितीत त्वचेची स्थिती खराब होते. त्याच बरोबर त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर चेहरा पूर्णपणे निस्तेज दिसू लागतो. उन्हाळ्यात ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी आणि त्वचेच्या समस्या दूर ठेवण्यासाठी महिलांना जसे विशेष स्किन केअरची आवश्यकता असते तसेच पुरुषांनी सुद्धा आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी उन्हाळ्यात स्किन केअर रुटीन फॉलो केले पाहिजे. जर पुरूषांना आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यायची असेल तर त्यांनी स्किन केअरच्या या स्टेप्सकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. जेणेकरून चेहरा चमकदार राहील. उन्हाळ्यात पुरुषांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

पुरुषांसाठी समर स्किन केअर रूटीन (S ummer Skin Care Routine for Men)

क्लिन्जिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग

दिवसाची सुरुवात क्लिंजिंगने करा. म्हणजे चेहरा नीट स्वच्छ करा. दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. जेणेकरून चेहऱ्यावर साचलेली धूळ, माती आणि प्रदूषण साफ करता येईल. तुम्ही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा डीप क्लीन देखील करू शकता. यासोबतच त्वचेवर टोनर लावल्याने पीएच पातळी संतुलित राहते आणि छिद्रही उघडतात. त्यानंतर मॉइश्चरायझिंग करायला विसरू नका.

सनस्क्रीन आवश्यक

चेहऱ्याला उन्हापासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन आवश्यक आहे. अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे त्वचेचे नुकसान वाढते. पिगमेंटेमेंटेशन आणि डार्क स्पॉट्ससह त्वचेची लवचिकता गमावू लागते. त्यामुळे चेहऱ्यावर सनस्क्रीन लावायला विसरू नका.

योग्य प्रोडक्ट निवडणे आहे आवश्यक

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर योग्य प्रोडक्ट निवडणे महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य प्रोडक्ट निवडा. मॉइश्चरायझरपासून फेस मास्क, फेस वॉशपर्यंत असे निवडा जे तुमच्या त्वचेला सूट करणारे असेल. चेहऱ्यावर एक्नेची समस्या किंवा सेसेंटिव्ह स्किनसाठी फक्त योग्य प्रोडक्ट वापरा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या