मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vaibhavi Upadhyaya: नेमका कसा झाला वैभवी उपाध्यायचा अपघात? पोलीस म्हणतात ‘सीटबेल्ट न लावता...’

Vaibhavi Upadhyaya: नेमका कसा झाला वैभवी उपाध्यायचा अपघात? पोलीस म्हणतात ‘सीटबेल्ट न लावता...’

May 26, 2023, 09:45 AM IST

  • Vaibhavi Upadhyaya Accident Update: वैभवी तिच्या होणाऱ्या पतीसोबत त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅलीला फिरायला चालली होती. त्याचवेळी हा अपघात घडला आहे.

Vaibhavi Upadhyaya

Vaibhavi Upadhyaya Accident Update: वैभवी तिच्या होणाऱ्या पतीसोबत त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅलीला फिरायला चालली होती. त्याचवेळी हा अपघात घडला आहे.

  • Vaibhavi Upadhyaya Accident Update: वैभवी तिच्या होणाऱ्या पतीसोबत त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅलीला फिरायला चालली होती. त्याचवेळी हा अपघात घडला आहे.

Vaibhavi Upadhyaya Accident Update: 'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा २३ मे रोजी अपघाती मृत्यू झाला. कमी वयातच जगाचा निरोप घेतल्याने तिच्या कुटुंबीयांमध्ये आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. वैभवी तिच्या होणाऱ्या पतीसोबत त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅलीला फिरायला चालली होती. त्याचवेळी बंजारजवळील सिधवा येथे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळले आणि वैभवीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती आता पोलिसांनी देखील दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बायकोचं सामान उचलून कुशल बद्रिके निघाला फिरायला, मजेशीर फोटो शेअर करत म्हणाला...

लंडनमध्ये राधिका मर्चंट- अनंत अंबानीसाठी पाकिस्तानी गायक अतिफ असलमने गायले गाणे, फोटो व्हायरल

Actor Sahil Khan arrested: महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला अटक

पूर्व पत्नी रीना दत्ता हिने आमिर खान याच्या लगावली होती कानशि‍लात, काय होते कारण?

आता या अपघातात काही नवीन गोष्टी समोर येत आहेत. कुल्लूच्या एसपी साक्षी वर्मा यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, वैभवी शेवटच्या क्षणापर्यंत कारच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, या प्रयत्नात तिला अपयश आले. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. एसपींनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘वैभवीला कारच्या खिडकीतून बाहेर पडायचे होते. परंतु, तिच्या डोक्याला जबरदस्त दुखापत झाली, जी तिच्यासाठी जीवघेणी ठरली आहे.’ या अपघातानंतर तिला तातडीने बंजार येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

त्यांची कार भरधाव वेगात चालवली जात होती, त्यामुळेच हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. मात्र, तिचा होणारा पती जय सुरेश गांधी याचा जीव वाचला. त्याला फक्त किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्याच्या दोन्ही हातांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, वैभवी दरीकडच्या बाजूला बसल्याने तिला गंभीर दुखापत झाली होती. दुर्दैवाने तिने सीट बेल्ट देखील घातला नव्हता. यातच तिच्या डोक्याला मार लागला आणि नंतर तिला हृदयविकाराचा झटका आला. काही वेळातच बरेच लोक जमले आणि त्यांना बाहेर काढण्यात आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

विभाग