मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ashish Vidyarthi Wedding: वयाच्या ६०व्या वर्षी आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर
Ashish Vidyarthi- Rupali Barua Wedding
Ashish Vidyarthi- Rupali Barua Wedding

Ashish Vidyarthi Wedding: वयाच्या ६०व्या वर्षी आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर

25 May 2023, 20:07 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Ashish Vidyarthi- Rupali Barua: आशिष विद्यार्थीने वयाच्या ६०व्या वर्षी फॅशन उद्योजक रुपाली बरुआशी लग्नगाठ बांधली.

Ashish Vidyarthi- Rupali Barua Wedding: बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी वयाच्या ६०व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. त्याने गुरुवारी कोलकाता येथील एका क्लबमध्ये आसामची फॅशन उद्योजक रुपाली बरुआसोबत रजिस्टर्ड मॅरेज केले. आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधत सर्वानांच हा सुखद धक्का दिला. महत्त्वाचे म्हणजे, आशिष विद्यार्थीने वयाच्या ६०व्या वर्षी लग्न केल्यामुळे चाहते चकित झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

रूपाली आणि आशिषने कोलकत्यामध्ये आपल्या जवळच्या मित्रपरिवार आणि कुटुंबाच्या उपस्थितीमध्ये रजिस्टर्ड लग्न केले. ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. आशिष आणि रुपाली यांची भेट कशी झाली? हा प्रश्न विचारला असता आशिष म्हणाला की, "ही खूपच मोठी स्टोरी आहे पुन्हा कधीतरी सांगेन. या वयात दुसऱ्यांदा रूपालीशी लग्न करून फारच वेगळं वाटत आहे. वयाच्या या टप्प्यावर रूपालीची साथ मिळाली आहे आणि त्याबाबत एक वेगळीच भावना आहे, असंही आशिषने म्हटले आहे."

गुरुवारी कोलकात्यात पार पडलेल्या या लग्नात दोघांचेही कुटुंबीय आणि दोघांचेही जवळचे मित्र लग्नासाठी उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर आता हे जोडप मित्रमंडळीसाठी आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष आणि रुपाली काही महिन्यांपूर्वीच एकमेकांना भेटले होते. त्यानंतर दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. हे नात पुढे घेऊन जाण्याचे त्यांनी ठरवलं. अखेर गुरवारी त्यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. रूपाली बरूआ मूळची आसामची आहे. तिचे कोलकातामध्ये फॅशन स्टोअर आहे.

विभाग