मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vaalvi IMDb Rating: ‘वाळवी’चा आयएमडीबीवरही धुमाकूळ; स्वप्नील-सुबोधच्या चित्रपटाचं रेटिंग पाहिलंत का?

Vaalvi IMDb Rating: ‘वाळवी’चा आयएमडीबीवरही धुमाकूळ; स्वप्नील-सुबोधच्या चित्रपटाचं रेटिंग पाहिलंत का?

Jan 17, 2023, 09:41 AM IST

    • Vaalvi IMDb Rating: अभिनेता सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी यांची मुख्य भूमिका असलेला ‘वाळवी’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
Vaalvi

Vaalvi IMDb Rating: अभिनेता सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी यांची मुख्य भूमिका असलेला ‘वाळवी’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

    • Vaalvi IMDb Rating: अभिनेता सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी यांची मुख्य भूमिका असलेला ‘वाळवी’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

Vaalvi IMDb Rating: मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक हटके प्रयोग होताना दिसत आहेत. वेगवेगळ्या विषयावरचे आणि धाटणीचे चित्रपट सध्या मराठीतही पाहायला मिळत आहेत. असाच एक प्रयोग सध्या ‘वाळवी’ या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळाला आहे. अभिनेता सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलेला दिसतोय. बॉक्स ऑफिसच नव्हे, तर आयएमडीबीवर देखील या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘रोशन सिंह सोढी’ साकारण्यासाठी गुरुचरण सिंहला किती मानधन मिळायचे?

‘वाळवी’ या चित्रपटाला आयएमडीबीवर ९.३ इतके रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे या चित्रपटाचे कौतुक होत आहे. याच रेटिंगमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट किती आवडला आहे, याची कल्पना येते. या चित्रपटातून एक हटके विषय मांडण्यात आला आहे. अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकाला खुर्चीला खिळवून ठेवतो. पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकाला लागून राहते. मराठीतील या थ्रिलर-सस्पेन्स चित्रपटाचं प्रेक्षक तोंडभरून कौतुक करत आहेत.

सोशल मीडियावर देखील ‘वाळवी’ची क्रेझ बघायला मिळत आहे. ‘आत्महत्या करणारी बायको सापडायला नशीब लागतं..’ या ओपनिंग डायलॉगनेच तुफान प्रसिद्धी मिळवली आहे. ‘वाळवी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाचं कथानक नेमकं काय आहे, यावर अनेकांनी बोलणं टाळालं. तर, मराठी मनोरंजन विश्वात झालेला हा यशस्वी प्रयोग सगळ्यांनी थिएटरमध्येच जाऊन पाहावा, असा आग्रह प्रेक्षक करत आहेत. मराठीतील मातब्बर कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळत आहे.

‘वाळवी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळत आहेत. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.