मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vaalvi Trailer: दिसतं तसं नसतं; वाळवी'चा रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित

Vaalvi Trailer: दिसतं तसं नसतं; वाळवी'चा रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 04, 2023 04:00 PM IST

Swapnil Joshi: चित्रपटाचे शिर्षक पाहाता चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. हा चित्रपट १३ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

वाळवी
वाळवी (HT)

'वाळवी' हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती, लाकूड पोखरणारी किड. एवढं नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर? अशीच नात्याला लागलेली वाळवी आपल्याला परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यापूर्वीच या चित्रपटाचे जबरदस्त टिझर अगदी अनोख्या पद्धतीनं प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. त्यामुळे या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार, याविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात आता 'वाळवी'चे थरारक असे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे.

१ मिनिटे ३५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये स्वप्नील जोशी आणि अनिता दाते नवरा बायको दिसत असून ते आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आहेत. मात्र हा स्वप्नीलने आखलेला डाव असून यात त्याला शिवानी मदत करत असल्याचे दिसतेय. हे सगळं होत असतानाच सुबोध त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर उत्सुकता वाढवणारा आहे.
वाचा: उर्फी जावेदची भाजप नेत्या चित्रा वाघ यांना शिवीगाळ; संपत्ती जाहीर करण्याचं आव्हान

क्षणोक्षणी कुतूहल वाढवणारा आणि गूढ असणाऱ्या 'वाळवी'त स्वप्नील आणि शिवानीचा मनसुबा पूर्ण होणार की, आखलेला डाव फिरणार ? सुबोधकडे असे नक्की काय गुपित आहे? वाळवीचा या सगळ्याशी काय संबंध ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला १३ जानेवारीला चित्रपटगृहात मिळणार आहेत.

वाळवी या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळणार आहेत. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

IPL_Entry_Point

विभाग