मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pallavi Joshi Accident : अभिनेत्री पल्लवी जोशी जखमी, आगामी चित्रपटाच्या सेटवर घडला मोठा अपघात

Pallavi Joshi Accident : अभिनेत्री पल्लवी जोशी जखमी, आगामी चित्रपटाच्या सेटवर घडला मोठा अपघात

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 17, 2023 08:52 AM IST

Pallavi Joshi Accident : प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी हिचा अपघात झाला असून, यात ती जखमी झाली आहे.

Pallavi Joshi
Pallavi Joshi

Pallavi Joshi Accident : प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी हिचा अपघात झाला असून, यात ती जखमी झाली आहे. आगामी बॉलिवूड चित्रपटाच्या सेटवर हा अपघात घडला आहे. यावेळी पल्लवी ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटाच्या एका दृश्याची शूटिंग करत होती. या चित्रपटाच्या सेटवरच तिला कारने जोरदार धडक दिली. या अपघातात अभिनेत्री जखमी झाली असून, तिला हैदराबादमधील एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ फेम अभिनेत्री आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची पत्नी पल्लवी जोशी सध्या ‘द व्हॅक्सीन वॉर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरू आहे. अशा परिस्थितीत कामात व्यस्त असलेल्या पल्लवीचा सेटवरच अपघात झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैदराबादमध्ये चित्रपटाच्या सेटवर एका कारने तिला धडक दिली, ज्यामुळे पल्लवी जखमी झाली.

मीडिया रिपोर्टनुसार घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, शूटिंगदरम्यान एका वाहनाने नियंत्रण गमावले आणि अभिनेत्रीला जोरदार धडक दिली. यादरम्यान पल्लवी जोशी जखमी झाली. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘द व्हॅक्सीन वॉर’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे शूटिंगही नुकतेच सुरू झाले होते. या चित्रपटात पल्लवी जोशी महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाच्या सेटवरच पल्लवी जोशीचा अपघात झाला. मात्र, पल्लवी जोशीने गाडीची धडक बसल्यानंतरही वेदना सहन करत पहिला आपला शॉट पूर्ण केला. काम संपवूनच ती उपचारासाठी गेली. तिच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे. पल्लवी जोशी नेहमीच तिच्या दमदार व्यक्तिरेखांसाठी ओळखली जाते. 'द कश्मीर फाइल्स'मध्ये ती युनिव्हर्सिटी प्रोफेसरच्या भूमिकेत झळकली होती. ‘द व्हॅक्सीन वॉर’मध्येही तिची अशीच दमदार व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point