मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sonu Sood Instagram : टपरीवर गुटखा खाऊन थुंकणाऱ्याला सोनू सूदने फटकारलं; व्हिडिओ शेयर करत म्हणाला...

Sonu Sood Instagram : टपरीवर गुटखा खाऊन थुंकणाऱ्याला सोनू सूदने फटकारलं; व्हिडिओ शेयर करत म्हणाला...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 16, 2023 08:12 PM IST

Sonu Sood Video Viral : नागपुरला जात असताना अभिनेता सोनू सूदने महामार्गावर थांबून एका स्टॉलवर चहा घेत तरुणांशी निवांत गप्पा मारल्या.

Sonu Sood Instagram Video Viral
Sonu Sood Instagram Video Viral (HT)

Sonu Sood Instagram Video Viral : कोरोनाकाळात परप्रांतीयांना मुंबईह त्यांच्या घरी सुरक्षितरित्या पोहचवून सामाजिक कार्यामुळं प्रसिद्ध झालेला अभिनेता सोनू सूद हा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. अनेकदा त्यानं संकटात सापडलेल्या तरुणांना आर्थिक मदतही केलेली आहे. त्यानंतर आता त्यानं असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यात त्यानं नागपुरला एका ठिकाणी थांबून स्टॉलवर चहा पित तरुणांशी गप्पा मारल्या आहे. याशिवाय तिथं गुटखा खाणाऱ्या तरुणांनाही सोनूने स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. त्यामुळं आता त्यांच्या बिनधास्त स्वभावाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

महाराष्ट्रातील चंद्रपुरहून नागपुरसाठी निघालेल्या सोनू सूदने महामार्गावर एका ठिकाणी चहा पिण्यासाठी गाडी थांबवली. त्यावेळी चहाच्या स्टॉलजवळ एक तरुण गुटखा खाऊन वेळोवेळी थुंकत होता. त्यावेळी सोनूने त्याला गुटखा खाल्लाय का, गुटखा थुंकून दे आणि यापुढे खाणं बंद कर, असं म्हणत फटकारलं आहे. त्यावेळी सोनूने स्पष्ट शब्दांत सुनावल्यानं तरुणाला धक्काच बसला. त्यानंतर तरुणानं यापुढे गुटखा खाणार नसल्याचं सांगितलं. त्यानंतर सोनू सूदने बराच वेळ तरुणांच्या घोळक्यासोबत अनेक विषयांवर गप्पा मारल्या. तरुणांनीही सोनूशी मनमोकळ्या पद्धतीनं चर्चा केली.

मलाही तुझ्या स्टॉलची पार्टनरशीप हवीय...

तरुणांशी बोलत असताना सोनू सूदने चहाचं स्टॉल चालवणाऱ्या तरुणाला किती कप चहाची विक्री झाली?, असा सवाल केला. त्यावेळी आतापर्यंत २०० ते ३०० कपची विक्री झाल्याचं तरुणानं सांगितलं. त्यावेळी सोनूने त्याला मलाही तुझ्या स्टॉलची पार्टनरशीप हवी असल्याचं गंमतीनं सांगितलं. त्यावेळी तरुणांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर तरुणांशी चहा पित गप्पा मारल्यानंतर सोनू पुढील प्रवासासाठी नागपुरच्या दिशेनं रवाना झाला. तरुणांशी मारलेल्या गप्पांचा व्हिडिओ सोनू सूदने इन्स्टाग्रामवर शेयर केला असून त्याला अनेकांनी शेयर केलं आहे. तर अनेकांनी त्यावर सोनू सूद हाच बॉलिवूडचा खरा हिरो असल्याचं सांगितलं आहे.

IPL_Entry_Point