मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  G20 Summit Pune: जी २० परिषदेची पुण्यात सुरुवात, देशविदेशातील मान्यवरांची उपस्थिती

G20 Summit Pune: जी २० परिषदेची पुण्यात सुरुवात, देशविदेशातील मान्यवरांची उपस्थिती

Jan 16, 2023 07:26 PM IST Kulkarni Rutuja Sudeep
  • twitter
  • twitter

  • G 20 Summit Pune : शहरांमध्ये शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय G-20 शिखर परिषदेच्या अंतर्गत पायाभूत सुविधांवरील कार्यगटाची पहिली मोठी बैठक पुण्यात होणार आहे. या दोन दिवसीय बैठकीत २० देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. याशिवाय जागतिक बँक, आशियाई बँकेचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात होणार आहे. बैठकीत या पायाभूत सुविधांसाठी माहितीपत्रक तयार करण्यात येणार आहे.

पुण्यात होणाऱ्या  जी २० बैठकीसाठी पुणे शहर रंगतदार होत आहे. रस्ते रंगवण्यात आले आहेत.  सगळीकडे स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 9)

पुण्यात होणाऱ्या  जी २० बैठकीसाठी पुणे शहर रंगतदार होत आहे. रस्ते रंगवण्यात आले आहेत.  सगळीकडे स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत.(HT)

पुणे विद्यापीठात होत असलेल्या महत्त्वाच्या बैठकीमुळे विद्यापीठाची सजावट करण्यात आली आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 9)

पुणे विद्यापीठात होत असलेल्या महत्त्वाच्या बैठकीमुळे विद्यापीठाची सजावट करण्यात आली आहे.(HT)

१६ आणि १७ जानेवारी रोजी पुण्यात होणाऱ्या जी २० बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विविध देशांतील सुमारे ३८  प्रतिनिधी लोहगाव विमानतळावर रवाना झाले होते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 9)

१६ आणि १७ जानेवारी रोजी पुण्यात होणाऱ्या जी २० बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विविध देशांतील सुमारे ३८  प्रतिनिधी लोहगाव विमानतळावर रवाना झाले होते.(HT)

भारताने यंदाच्या जी २० शिखर परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. त्यामुळे देशात परिषदेच्या बैठका सुरू आहेत. शहरातील सेनापती बापट रोडवर असलेल्या जे डब्ल्यू मॅरियाॅट हॉटेलमध्ये पायाभूत सुविधांची बैठक होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 9)

भारताने यंदाच्या जी २० शिखर परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. त्यामुळे देशात परिषदेच्या बैठका सुरू आहेत. शहरातील सेनापती बापट रोडवर असलेल्या जे डब्ल्यू मॅरियाॅट हॉटेलमध्ये पायाभूत सुविधांची बैठक होणार आहे.(HT)

शहरी विकासापासून शाश्वत जीवनापर्यंत एकूण सात सत्रे होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सहसचिव सोलोमन आरोकिराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
twitterfacebookfacebook
share

(5 / 9)

शहरी विकासापासून शाश्वत जीवनापर्यंत एकूण सात सत्रे होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सहसचिव सोलोमन आरोकिराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.(HT)

देशातील शहरांचा विकास कसा करायचा? शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाय शोधणे, शहरे विकसित करण्यासाठी जागतिक स्तरावरून निधी गोळा करणे, शाश्वत जीवनशैली आदींवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 9)

देशातील शहरांचा विकास कसा करायचा? शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाय शोधणे, शहरे विकसित करण्यासाठी जागतिक स्तरावरून निधी गोळा करणे, शाश्वत जीवनशैली आदींवर या बैठकीत चर्चा होणार आहे.(HT)

जागतिक पायाभूत सुविधा, वाढते शहरीकरण आणि त्यासमोरील आव्हाने यावर चर्चा होणार आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत 'नगरीकरण'वर चर्चा होईल.
twitterfacebookfacebook
share

(7 / 9)

जागतिक पायाभूत सुविधा, वाढते शहरीकरण आणि त्यासमोरील आव्हाने यावर चर्चा होणार आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत 'नगरीकरण'वर चर्चा होईल.(HT)

इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची पहिली बैठक १६ आणि १७  जानेवारीला पुण्यात होणार आहे. यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी सुरक्षेसाठी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(8 / 9)

इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची पहिली बैठक १६ आणि १७  जानेवारीला पुण्यात होणार आहे. यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी सुरक्षेसाठी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.(HT)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जी २०  बैठकीच्या ठिकाणी असलेल्या प्रदर्शन सभागृहांना भेट दिली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख मट्टीतारू उपस्थित होते.
twitterfacebookfacebook
share

(9 / 9)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जी २०  बैठकीच्या ठिकाणी असलेल्या प्रदर्शन सभागृहांना भेट दिली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख मट्टीतारू उपस्थित होते.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज