मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pradeep Solunke : राष्ट्रवादीचा झटका! बंडखोर प्रदीप सोळुंके यांची काही तासांतच पक्षातून हकालपट्टी

Pradeep Solunke : राष्ट्रवादीचा झटका! बंडखोर प्रदीप सोळुंके यांची काही तासांतच पक्षातून हकालपट्टी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 16, 2023 07:33 PM IST

MLC Election News : मराठवाडा शिक्षक मतदारसंघात अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणारे प्रदीप सोळुंके यांची राष्ट्रवादी काँग्रेसनं हकालपट्टी केली आहे.

Pradeep Solunke - Vikram Kale
Pradeep Solunke - Vikram Kale

NCP Sack Pradeep Solunke : शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सध्या मोठा गोंधळ उडाला आहे. नाशिक पदवीधरमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारानं अर्ज भरला नसताना आता औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंड झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं याची गंभीर दखल घेऊन बंडखोराला थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीनं विक्रम काळे यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलं आहे. काळे यांच्या उमेदवारीला विरोध करत प्रदीप सोळुंके यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं राष्ट्रवादी बरोबरच महाविकास आघाडीचीही मोठी गोची झाली आहे. राष्ट्रवादीनं सोळुंके यांच्यावर तात्काळ कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

NCP Release
NCP Release

प्रदीप सोळुंके यांचं म्हणणं काय?

विक्रम काळे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सोळुंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘मी गेल्या ३३ वर्षांपासून ज्ञानदानाचं कार्य करत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक संघटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. राष्ट्रवादी शिक्षक संघटनेची स्थापनाही मी केली. असं असतानाही पक्षानं माझ्या नावाचा विचार केला नाही. उमेदवारी मिळाली नाही तरी मी अर्ज दाखल करणार आहे याची माहिती पक्षाला आधीच दिली होती. त्यानुसारच अर्ज भरला आहे, असं त्यांनी सांगितलं.

'विद्यमान आमदारांनी शिक्षकांचे कुठलेही प्रश्न सोडवलेले नाहीत. शिवाय, पक्ष वाढवण्यासाठीही काही केलेलं नाही. त्यामुळं शिक्षक मतदार त्यांच्यावर तीव्र नाराज आहेत. याचे परिणाम निवडणुकीतून दिसतील, असं सोळुंके म्हणाले. ‘एकाच व्यक्तीला सतत तिकीट देणं चुकीचं आहे. आता भाकरी परतायला हवी. माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांनी हक्कापासून वंचितच राहायचं का?,’ असा सवालही त्यांनी केला.

IPL_Entry_Point