मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shiv Thakare : खतरनाक स्टंट्सचा सामना करताना ‘खिलाडी’ शिव ठाकरे आयुष्यात आली नवी मैत्रीण!

Shiv Thakare : खतरनाक स्टंट्सचा सामना करताना ‘खिलाडी’ शिव ठाकरे आयुष्यात आली नवी मैत्रीण!

May 16, 2023, 02:17 PM IST

  • Shiv Thakare New Friend: रोहित शेट्टीच्या शोमध्ये मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे देखील झळकणार आहे. दरम्यान, या शोच्या सेटवर शिव ठाकरे याला एक नवी मैत्रीण मिळाली आहे.

Shiv Thakare

Shiv Thakare New Friend: रोहित शेट्टीच्या शोमध्ये मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे देखील झळकणार आहे. दरम्यान, या शोच्या सेटवर शिव ठाकरे याला एक नवी मैत्रीण मिळाली आहे.

  • Shiv Thakare New Friend: रोहित शेट्टीच्या शोमध्ये मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे देखील झळकणार आहे. दरम्यान, या शोच्या सेटवर शिव ठाकरे याला एक नवी मैत्रीण मिळाली आहे.

Shiv Thakare New Friend: ‘खतरों के खिलाडी १३’च्या शूटिंगसाठी १४ स्पर्धकांसह संपूर्ण टीम दक्षिण आफ्रिकेत पोहोचले आहेत. आता सोशल मीडियावर अनेक सेलेब्सनी आपले या शोमधील अपडेट्स चाहत्यांना देण्यास सुरुवात केली आहे. आता ‘खतरों के खिलाडी १३’चा होस्ट रोहित शेट्टी लवकरच त्याच्या जुन्या स्टाईलमध्ये परतताना दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या या शोमध्ये मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे देखील झळकणार आहे. दरम्यान, या शोच्या सेटवर शिव ठाकरे याला एक नवी मैत्रीण मिळाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘रोशन सिंह सोढी’ साकारण्यासाठी गुरुचरण सिंहला किती मानधन मिळायचे?

‘बिग बॉस १६’च्या दरम्यानही शिव ठाकरे त्याच्या इतरांशी जमलेल्या मैत्रीमुळे लोकप्रिय झाला होता. आता ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये एन्ट्री घेतल्यानंतर देखील त्याने स्पर्धकांशी मैत्री करण्यास सुरुवात केली आहे. ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये अभिनेत्री अंजुम फकीहसोबत शिवची चांगली गट्टी जमली आहे. अंजुम शिवची पहिली मैत्रीण बनली आहे. ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री अंजुम फकीहने तिच्या इंस्टाग्रामवर केपटाऊनमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्री शिव ठाकरेसोबत धमाल-मस्ती करताना दिसत आहे. दोघांचे बाँडिंग पाहण्यासारखे आहे.

Sameer Wankhede: समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडे १८ कोटी मागितले? पत्नी क्रांती रेडकर म्हणते...

फोटो पोस्ट शेअर करताना अंजुमने शिवचे तोंडभरून कौतुक केले आहे. अभिनेत्रीने या पोसतमध्ये लिहिले की, ‘मला आता एक सोनेरी हृदयाचा व्यक्ती गवसला आहे. मी प्रार्थना करते की, त्याला दीर्घायुष्य लाभावं. या मैत्रीमध्ये प्रेम आहे. आपण भांडू, लढू, खेळू, चुका करू आणि सगळ्या गोष्टी विसरून एकमेकांना क्षमा देखील करू.. तुझ्यासारखा मित्र आयुष्यभर असावा... नाही का? माझा प्रिय शिव.’

शिवनेही अंजुमच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत तिचे कौतुक केले. त्याने लिहिले, ‘अरे आता काय राद्व्णार आहेस का वेडे... ही मुलगी एकदम ऑलराउंडर आहे बाबा... ती जे काही करते ते सर्वोत्तम असतं.’ या फोटोंमध्ये अंजुम आणि शिव केपटाऊनमध्ये धमाल करताना दिसत आहेत. अंजुम फकीहने इतर काही स्पर्धकांसोबत तिचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री अंजुम फकीह शिव, रुही चतुर्वेदी आणि अरिजित तनेजासोबत धमाल करताना दिसत आहे.