मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sameer Wankhede: समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडे १८ कोटी मागितले? पत्नी क्रांती रेडकर म्हणते...

Sameer Wankhede: समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडे १८ कोटी मागितले? पत्नी क्रांती रेडकर म्हणते...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 16, 2023 12:18 PM IST

Kranti Redkar reaction on Sameer Wankhede Case: एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर कठोर कारवाई केल्यानंतर आता त्यांची पत्नी-अभिनेत्री क्रांती रेडकरचे वक्तव्य समोर आले आहे.

Kranti Redkar
Kranti Redkar

Kranti Redkar reaction on Sameer Wankhede Case: आर्यन खान प्रकरणात लाच मागितल्याचे समोर आल्याने सीबीआयने मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर कठोर कारवाई केल्यानंतर आता त्यांची पत्नी-अभिनेत्री क्रांती रेडकरचे वक्तव्य समोर आले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कर्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टीवर छापा टाकल्यानंतर आर्यन खानला वाचवण्यासाठी समीर वानखेडे यांनी सुपरस्टार शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप अभिनेत्री क्रांती रेडकरने स्पष्टपणे फेटाळून लावला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना क्रांती रेडकर म्हणाली की, 'त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. हे सर्वांना माहीत आहे. हा देखील केवळ एक आरोप आहे. संपूर्ण तपासात आम्ही सीबीआय अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून पुढेही आम्ही तपासात पूर्ण सहकार्य देत राहू.’

Gauri Khan: गौरी खानने स्वतः सजवला ‘मन्नत’ बंगला! पण या मागचं खरं कारण ऐकलंत का?

या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना समीर वानखेडे म्हणाले होते की, मला देशभक्त असल्याची शिक्षा दिली जात आहे. सीबीआयच्या १८ अधिकाऱ्यांनी माझ्या घरावर छापा टाकला. माझी पत्नी आणि मुलींसमोर सुमारे १२ तास हा छापा सुरू होता. या छाप्यात त्यांच्याकडे २३ हजार रुपये आणि चार मालमत्तांची कागदपत्र मिळाली. मात्र, ही मालमत्ता आपण सेवेत रुजू होण्यापूर्वी खरेदी केली होती, असे त्यांनी म्हटले आहे.

सीबीआय अधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिचाही फोन ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. एनसीबीच्या विशेष तपास पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, वानखेडे यांनी आपल्या परदेश दौऱ्यावरील खर्चाबाबतही चुकीची माहिती दिली आहे. वानखेडे यांनी आपल्या परदेश दौऱ्याचे सूत्रही उघड केलेले नाही. त्यांनी आपल्या विभागाला माहिती न देता महागडी घड्याळे खरेदी करून परस्पर विकली आहेत. सीबीआयने केलेल्या आरोपांमध्ये असेही म्हणण्यात आले आहे की, वानखेडे यांची मालमत्ता आणि त्यांच्या उत्पन्नात कोणताही परस्पर संबंध नाही.

IPL_Entry_Point