मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gauri Khan: गौरी खानने स्वतः सजवला ‘मन्नत’ बंगला! पण या मागचं खरं कारण ऐकलंत का?

Gauri Khan: गौरी खानने स्वतः सजवला ‘मन्नत’ बंगला! पण या मागचं खरं कारण ऐकलंत का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 16, 2023 10:01 AM IST

Gauri Khan Coffee Table Book Launch : शाहरुख आणि गौरीने प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक कठीण क्षणात एकमेकांचा हात धरला. आयुष्यातील प्रत्येक चढउतारावर दोघांनी एकमेकांना साथ दिली.

Gauri Khan-Shah Rukh Khan
Gauri Khan-Shah Rukh Khan

Gauri Khan Coffe Table Book Launch : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान हे बॉलिवूडमधील सर्वात आदर्श कपल मानले जाते. शाहरुख आणि गौरीने प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक कठीण क्षणात एकमेकांचा हात धरला. आयुष्यातील प्रत्येक चढउतारावर दोघांनी एकमेकांना साथ दिली. आता शाहरुख खानच्या हस्ते १५ मे रोजी गौरी खानचे कॉफी टेबल बुक लॉन्च केले. या सोहळ्या दरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खुलासे केले. यावेळी शाहरुखने गौरी खानचे तोंडभरून कौतुकही केले आहे.

यावेळी शाहरुख खानने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दलही सांगितले. शाहरुखने सांगितले की, जेव्हा त्याच्याकडे घर डिझाईन करण्यासाठी डिझायनर निवडण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा गौरी खानने स्वतः पुढाकार घेऊन 'मन्नत' डिझाईन केला. गौरी खान केवळ शाहरुखची पत्नीच नाही, तर प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर देखील आहे. तिची स्वतःची इंटिरियर डिझायनिंग कंपनी देखील आहे. आता गौरी खानने ‘माय लाईफ इन डिझाईन’ नावाचे कॉफी टेबल बुक लॉन्च केले आहे. या पुस्तकात गौरी खानने इंटिरिअर डिझायनर म्हणून तिचा प्रवास उलगडला आहे.

Cannes Film Festival 2023: अनुष्का शर्मा ते मानुषी छिल्लर; बॉलिवूडकर करणार ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर डेब्यू!

या लाँच इव्हेंटमध्ये शाहरुखने सांगितले की, गौरी खान ‘मन्नत’ डिझाईन करण्यापासून तिच्या इंटेरिअर डिझायनर करिअरचीची सुरुवात केली. शाहरुख म्हणाला, 'आम्ही घर विकत घेतलं, तेव्हा आम्हाला ते खूप आवडलं होतं. पण ते आमच्या आवाक्याबाहेर होतं. दिल्लीत आधीच घरासाठी भरपूर पैसे खर्च केल्याने, मुंबईतील हा बंगला महाग आहे असे मला वाटले नाही. या बंगल्यापूर्वी आम्ही ताज लँड्स एंड येथील एका घरात राहत होतो. ते माझ्या दिग्दर्शकाचं घर होतं. त्यांनी आम्हाला राहण्यासाठी ते घर दिले होते. त्यावेळी आमच्याकडे जास्त पैसे नव्हते आणि पैसे आल्यावर आम्ही हा बंगला विकत घेतला.’

शाहरुख पुढे म्हणाला, 'पण बंगला विकत घेऊनही नंतरचा खर्च आमच्या आवाक्याबाहेर होता. घर खरेदी करणे ही वेगळी बाब आहे. पण ते नीटनीटकं ठेवणं आणि सुव्यवस्था राखणं यासाठी आणखी पैशांची आवश्यकता होती. त्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. आम्ही काही डिझायनरला फोन केले, पण त्यांनी सांगितलेला खर्चाचा आकडा आम्हाला परवडत नव्हता. त्याकाळी आमच्याकडे इतके पैसे नव्हते. मग मी गौरीची मदत घेतली. मी गौरीला म्हणालो की, तुझ्यात कलात्मकता आहे, मग तू डिझायनर का होत नाहीस? अशा प्रकारे मन्नतच्या डिझायनिंगला सुरुवात झाली. आम्ही जे काही पैसे कमावले ते ‘मन्नत’साठी वस्तू विकत घेण्यात खर्च केले. इथूनच गौरीच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.’

IPL_Entry_Point

विभाग