मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shiv Thakare Video: आईचा आशीर्वाद अन् प्रेम गाठीशी बघून शिव ठाकरे निघाला नव्या प्रवासाला! व्हिडीओ व्हायरल

Shiv Thakare Video: आईचा आशीर्वाद अन् प्रेम गाठीशी बघून शिव ठाकरे निघाला नव्या प्रवासाला! व्हिडीओ व्हायरल

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 08, 2023 07:36 AM IST

Shiv Thakare In Khatron Ke Khiladi 13: सोशल मीडियावर शिव ठाकरे आणि त्याच्या आईचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिव आपल्या आईचा आशीर्वाद घेताना दिसत आहे.

Shiv Thakare With Mother
Shiv Thakare With Mother

Shiv Thakare In Khatron Ke Khiladi 13: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय स्टंट शो ‘खतरों के खिलाडी’चा १३वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये मनोरंजन विश्वातील अनेक बहुचर्चित चेहरे झळकणार आहेत. मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे देखील या खतरों के खिलाडीच्या १३व्या सीझनमध्ये सहभागी होणार आहे. आता या शोची शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. कलाकर देखील आता स्टंट करण्यासाठी तयार झाले आहे. अभिनेता शिव ठाकरे देखील आपल्या आईचे आशीर्वाद घेऊन आता या नव्या प्रवासासाठी सज्ज झाला आहे.

सोशल मीडियावर शिव ठाकरे आणि त्याच्या आईचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिव आपल्या आईचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. तर, शिवची आईदेखील त्याचं औक्षण करून त्याला शुभेच्छा देत आहे. दूर देशात चाललेला आपला मुलगा जिंकून परतावा म्हणून शिवची आई त्याला अनेक आशीर्वाद देत आहे. माय-लेकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होता आहे. चाहते देखील त्याच्या या व्हिडीओवर कमेंट्स करून त्याला शुभेच्छा देत आहेत.

‘बिग बॉस १६’च्या माध्यमातून लोकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण करणारा शिव ठाकरे शो संपल्यानंतरही नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याच्याबद्दल रोज काही ना काही अपडेट समोर येत असतात. सलमान खानच्या ‘बिग बॉस १६’ या रिअॅलिटी शोनंतर 'खतरों के खिलाडी १३' या शो मधून तो आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या निमित्ताने शिव ठाकरे याने नुकतेच सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेतले होते. आता तो या शोच्या शूटिंगला रवाना होणार आहे.

शिव ठाकरे हा प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि कोरिओग्राफर देखील आहे. त्याचा जन्म अमरावती येथे १९८९ साली झाला. ‘एमटीव्ही रोडीज रायझिंग’मधून तो पहिल्यांदा टीव्हीवर झळकला होता. तर, ‘बिग बॉस हिंदी’मध्ये येण्यापूर्वी तो ‘बिग बॉस मराठी’मध्येही दिसला होता. ‘मराठी बिग बॉस’ या शोच्या दुसऱ्या सीझनचा तो विजेता ठरला आहे.

IPL_Entry_Point

विभाग