मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: अखेर उलगडा होणार! कार्तिक नव्हे ‘या’ व्यक्तीने संपवलं साक्षीचं आयुष्य

Rang Maza Vegla: अखेर उलगडा होणार! कार्तिक नव्हे ‘या’ व्यक्तीने संपवलं साक्षीचं आयुष्य

Apr 19, 2023, 11:59 AM IST

  • Rang Maza Vegla Latest Update: साक्षीचा मृत्यू कसा झाला आणि तो कुणी केला, याचा उलगडा आता लवकरच होणार आहे.

Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Update: साक्षीचा मृत्यू कसा झाला आणि तो कुणी केला, याचा उलगडा आता लवकरच होणार आहे.

  • Rang Maza Vegla Latest Update: साक्षीचा मृत्यू कसा झाला आणि तो कुणी केला, याचा उलगडा आता लवकरच होणार आहे.

Rang Maza Vegla Latest Update: रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता प्रेक्षकांना एक मोठा ट्वीस्ट बघायला मिळणार आहे. मालिकेचा सध्याचा ट्रॅक हा अतिशय मनोरंजक वळणावर आला आहे. साक्षीच्या मृत्यू प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा भोगून आलेला कार्तिक आता दीपावर सूड उगवत आहे. या प्रकरणात दीपा आणि कार्तिक दोघांचाही काही दोष नसताना त्यांना हकनाक या प्रकरणात अडकायला लागले होते. इतकं सगळं होऊनही साक्षीचा जीव कसा गेला, हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीतच होता. मात्र, आता लवकरच या खुनाचा आणि त्यामागील गुन्हेगाराचा उलगडा होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिराम खरंच लीलाच्या कानाखाली मारणार? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार जबरदस्त ट्विस्ट

सरगमची अट मान्य करून अक्षरा तिला घरात घेऊन येईल का? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये येणार ट्वीस्ट

सायली देवासमोर खोटी शपथ घेणार की लग्नाचं सत्य कबुल करणार? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक! गुन्हेगारांची केली होती मदत

तब्बल १४ वर्षांपूर्वी कार्तिक आणि दीपा यांचा संसार पूर्वपदावर आलाच होता, तेव्हाच साक्षीचा एक दुर्धर आजार बळावला. ऐनवेळी कोणताही डॉक्टर ऑपरेशनसाठी जागेवर नसल्याने स्वतः कार्तिकने साक्षीचं ऑपरेशन करून तिचा जीव वाचवला होता. मात्र, याच दरम्यान असं काहीतरी घडलं की, ज्यामुळे साक्षीचा जीव गेला. यावेळी कार्तिकने ऑपरेशन चुकीच्या पद्धतीने केलं आणि त्यानेच मुद्दाम साक्षीचा जीव घेतला असा आरोप त्याच्यावर करण्यात आला. या सगळ्यात कार्तिक आणि दीपाला अतिशय चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आलं. यानंतर दीपामुळे तुला शिक्षा झाली, असं कार्तिकच्या मनात भरवून त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासात पाठवण्यात आलं.

Salman Khan: सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ला टक्कर देण्यासाठी एकही चित्रपट नाही!

मात्र, आता साक्षीचा जीव घेणाऱ्या व्यक्तीचा चेहरा समोर येणार आहे. साक्षीचा जीव घेणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून आयेशाच आहे. साक्षीच्या मृत्यू प्रकरणात दीपा आणि कार्तिकला अडकवणाऱ्या घाडगे वकिलाचा हा डाव असून, तो आता आयेशाचं नाव समोर आणणार आहे. एका केसमध्ये पैसे घेऊन खोटं बोलल्याबद्दल घाटगे वकील आणि कार्तिक यांच्यात वैर निर्माण झालं होतं. याचाच बदल घेण्यासाठी घाडगे वकिलाने हा डाव रचला होता.

साक्षी रुग्णालयात असताना आयेशा देखील कार्तिकला शोधायला तिथे पोहोचली होती. याचवेळी तिने साक्षीला संपवण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट घाडगे वकिलाला माहित होती. याचाच फायदा घेऊन त्याने इनामदार कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी कट रचला. तब्बल १४ वर्षांनंतर देखील तो हा सूड उगवत आहे. यात त्याने आता आयेशाच्या बहिणीच्या मुलाला देखील अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याने या कटात सामील होण्यास नकार दिल्यावर आता घाडगे वकील साक्षीच्या आरोपीचं म्हणजेच आयेशाचं नाव उघड करण्याची धमकी देणार आहे.