मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ला टक्कर देण्यासाठी एकही चित्रपट नाही!

Salman Khan: सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ला टक्कर देण्यासाठी एकही चित्रपट नाही!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 18, 2023 06:54 PM IST

Movies Releasing This Week : सलमान खानच्या या चित्रपटाशी स्पर्धा नको म्हणून या आठवड्यात इतर कोणताही बिग बजेट चित्रपट रिलीज होणार नाहीये.

Salman Khan
Salman Khan

Movies Releasing This Week : एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठड्यात बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात सलमान खान याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमान खान एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाचा पहिला लूक पाहून चाहत्यांमध्ये या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील काही गाणी आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. आता काहीच दिवसांत हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमान खानच्या या चित्रपटाशी स्पर्धा नको म्हणून या आठवड्यात इतर कोणताही बिग बजेट चित्रपट रिलीज होणार नाहीये. मात्र, सध्या ‘किसी का भाई किसी की जान’ला हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. एकीकडे सलमान खान देखील तब्बल ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. मात्र, या चित्रपटातील त्याचा लूक पाहून अनेकांनी या चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. एकंदरीत हा आठवडा बॉक्स ऑफिससाठी काहीसा थंडच असणार, असे चित्र निर्माण झाले आहे.

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धच्या आयुष्यात आता तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री होणार? कथानकात ट्वीस्ट!

सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटासोबत एकही हिंदी चित्रपट रिलीज होणार नसल्याने, या चित्रपटाला त्याचा काहीसा फायदा मिळू शकतो. तर, दुसरीकडे ईदची सुट्टी असल्याने भाईजानच्या या चित्रपटाला गर्दी जमू शकते, असे देखील म्हटले जात आहे. गतवर्षी प्रमाणेच यंदाही बॉलिवूड चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर थंड प्रतिसाद मिळत आहे. तर, दुसरीकडे सलमान खानचे काही चित्रपट लागोपाठ सुपरफ्लॉप ठरले आहेत. मागील काही वर्षात रिलीज झालेले सलमान खान याचे चित्रपट सातत्याने बॉक्स ऑफिसवर आपटताना दिसत आहेत. ‘ट्यूबलाईट’, ‘भारत’, ‘राधे’, ‘अंतिम’ अशा चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती.

सलमान खानच्या यंदा रिलीज होणाऱ्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा होत्या. परंतु, एकंदरीत सध्याचं चित्र पाहता, या अपेक्षा कितपत पूर्ण होऊ शकतील यात शंकाच आहे. सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट २१ एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त पूजा हेगडे, शहनाज गिल, व्यंकटेश दग्गुबाती, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, पलक तिवारी आणि जस्सी गिल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग